संदर्भ :- 1) शासन निर्णय क्र. जिपब-४१४/प्र.क्र.११२/आस्था-१४. दि.१५ मे, २०१४
2) शासकीय कर्मचा-यांच्या बदल्याचे विनियमन आणि कर्तव्य पार पाडतांना होणा-या विलंबास प्रतिबंध अधिनियम, २००५.
संदर्भीय शासन निर्णयामध्ये नमूद केल्यानुसार कर्मचाचा-यांच्या संवर्गनिहाय वास्तव्य सेवाजेष्ठता त्यामध्ये एकाच मुख्यालयी ५ वर्ष सेवाकालावधी पूर्ण झालेल्या कर्मचा-यांची तालुका अंतर्गत बदल्यासाठी व तालुक्या बाहेरील बदल्यासाठी १० वर्ष पूर्ण झालेल्या कर्मचा-यांची स्वंतत्र संवर्ग निहाय वास्तव्य ज्येष्ठता यादी तयार करण्यात यावी. ज्येष्ठतेसाठी त्या वर्षाच्या 31 मे पर्यत झालेली सेवागृहीत धरण्यात यावी अशा सूचना दिलेल्या आहेत. तसेच दरवर्षी माहे में मध्ये बदली प्रक्रिया पूर्ण करणेबाबत निर्देश आहेत.
वरिल संदर्भिय शासन निर्णय व अधिनियमानुसार शासन बदल्याबाबतचे मार्गदर्शक तत्वे / नियमाबाबत शासनाने स्थायी सूचना दिलेल्या आहेत. सदर शासन नियम व अधिनियमाच्या प्रती वेळोवेळी आपणास निर्गमित करण्यात आलेल्या आहेत. त्यातील मार्गदर्शक सुचनानुसार आपण सन २०२४ या वर्षामध्ये बदलीपात्र होणा-या कर्मचा-याची यादी विहीत प्रपत्रामध्ये कर्मचा-यांना अवलोकनासाठी प्रसिध्द करण्यात यावी. सदर वास्तव्य ज्येष्ठता सर्व कर्मचा- यांच्या निदर्शनास आणून त्यावर त्यांची स्वाक्षरी घेण्यात यावी. सदर यादीवर आक्षेप/हरकती मागवून घेऊन कर्मचा- यांकडून प्राप्त होणा-या आक्षेप/हरकती, उणिवा याबाबत शहानिशा करून अंतिम वास्तव्य सेवा जेष्ठता यादी दि.२२ मार्च २०२४ पर्यत तयार करण्यात यावी व केलेल्या कार्यवाहीचा अनुपालन अहवाल २६ मार्च २०२४ पर्यंत या कार्यालयास सादर करण्यात यावा.