जिल्हा परिषद शाळांतील शिक्षक समायोजनास खंडपीठाकडून स्थगिती teacher samayojan 

Join Now
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

जिल्हा परिषद शाळांतील शिक्षक समायोजनास खंडपीठाकडून स्थगिती teacher samayojan 

लातूर: लातूरसह राज्यातील जिल्ला परिषद

प्राथमिक शाळांतील अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजन प्रक्रियेस छत्रपती संभाजीनगर येथील खंडपीठाने स्थगिती दिली. यासंदर्भात, माझ्यासह आठ जणांनी याचिका दाखल केली होती, अशी माहिती याचिकाकर्ते शरद हुडगे यांनी दिली.

लातूर जि. प.च्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी १२ मार्च २०२४ रोजी पत्र काढून लातूर जिल्हा परिषदे अंतर्गत प्राथमिक शाळांची ३० नोवोंबर २०२२ रोजीच्या पटसंख्येवर २०२२, २३ ची संचमान्यता समोर ठेवून अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन करण्याचे आदेश दिले होते. मात्र, ही संचमान्यता चुकीची झाल्याने सदर समायोजनात अनेक शाळांतील शिक्षक अतिरिक्त ठरत असल्याने त्यात दुरूस्ती करूनच समायोजन करावे, अशी मागणी लातूर जिला परिषद प्राथमिक शिक्षक संघटना समन्वय समितीने करीत छत्रपती संभाजीनगर येथील खंडपीठात याचिका दाखल केली. लातूर जिल्हा परिषदेने प्राथमिक शाळांची ३० नोव्हेंबर २०२२ रोजीच्या पटसंख्येवर २०२२, २३ ची संचमान्यत्ता पोर्टलवर उपलब्ध असली तरी ही संचमान्यता आधार वॉलिड संख्येवर केली. ३० नोव्हेंबर २०२२ रोजी आधार व्हॅलिड विद्यार्थी संख्या कमी होती. त्यामुळे एक, दोन व्हॅलिड विद्यार्थी संख्येमुळे काही शाळांतील शिक्षकांची पदे नामंजूर झाली. प्रत्यक्षात शाळेत व हजेरी पटावर विद्यार्थी उपस्थिती आहे. आधारकार्डवरील नाव, जन्म तारखेतील तफावतीमुळे विद्यार्थी व्हॅलिड होऊ शकले नाहीत. या विषयावर खंडपीठाने आधार फक्त ओळख असून, शाळेची संचमान्यता शाळेतील

Teacher samayojan
Teacher samayojan

पटसंख्येवर करावी, असा निकाल दिलेला आहे. या निकालानंतर पटसंख्येवर आधारित २०२२, २३ ची सुधारित संचमान्यता उपलब्ध करून देणे आवश्यक होते. मात्र, शिक्षण विभागाने सुधारित संचमान्यता उपलब्ध करून दिली नाही. २०२२, २३ च्या संचमान्यतेत आधार वॉलिड बरोबरच वर्गखोल्या नोंदवणे व त्यावर आधारित शिक्षक संख्या निश्चित करणे, या बाबीच्या माहिती अभावी व पोर्टलच्या चुकीने बऱ्याच शाळांतील शिक्षक अतिरिक्त ठरले.

चुकीची झालेली संचमान्यता प्राथमिक शिक्षण विभागाने शिक्षण संचालकांकडे दुरुस्तीसाठी पाठवली, पण ती अद्याप दुरूस्त झालेली नाही. आता २०२३, २४ या शैक्षणिक वर्षातील दुसरे सत्र संपत आले आहे. २०२३, २४ ची संचमान्यता ३० सप्टेंबर २०२३ नुसार पोर्टलवर दाखवत आहे. ३० सप्टेंबर २०२३च्या पटसंख्येवर २०२३, २४ च्या संचमान्यतेनुसार समायोजन झाल्यास २०२२. २३ च्या संचमान्यतेतील अनियमितता, त्रुटी दूर होऊन समायोजन पारदर्शक होईल. या बाबी शिक्षक संघटना समन्वय समितीने मुख्य कार्यकारी अधिकारी, शिक्षणाधिकारी (प्रा.) यांच्या निदर्शनास आणून दिल्या, यासंदभनि, शरद हुडगे, रमेश गोमारे, चंद्रकांत भोजने यांनी खंडपीठात याचिका दाखल केली. शालेय शिक्षणचे मुख्य सचिव, ग्रामविकासचे सचिव, शिक्षण आयुक्त, शिक्षण संचालकांना माणणे मांडण्यास सांगून राज्याची समायोजन प्रक्रिया स्थगित करावी, असे खंडपीठाने आदेश दिल्याचे याचिकाकत्यांचे महणणे आहे.

लातूर जिल्ह्यात १३८ शाळांत अतिरिक्त शिक्षक

जानवळ (ता. चाकूर) जि. प. प्राथमिक शाळेतील सर्व शिक्षक अतिरिक्त ठरले, तसेच लातूर जिल्ह्यातील १३८ शाळांतील शिक्षक चुकीच्या संचमान्यतेमुळे अतिरिक्त झाले आहेत, असे याचिकाकर्ते शरद हुडगे, रमेश गोमारे, चंद्रकांत भोजने यांचे महणणे आहे.

स्थगिती मिळाल्याचे वकिलाकडून कळाले

गुरुवारपासून (दि. १४) आपण शिक्षक समायोजनाची प्रक्रिया करणार होतो. आक्षेप मागवले होते. या प्रक्रियेस २० मार्चपर्यंत खंडपीठाने स्थगिती दिल्याचे आमच्या वकिलांनी सांगितले. या दरम्यान, संचमान्यता दुरुस्त करण्यात येईल, असे निर्देश दिले आहेत. त्यामुळे आम्ही समायोजन थांबवले आहे,

३० माचपयत स्थागता

जिल्हा परिषद प्राथमिक शाळांतील अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजन प्रक्रियेस छत्रपती संभाजीनगर येथील खंडपीठाने स्थगिती दिल्याचे आमच्या वकिलांनी कळविले. ही स्थगिती ३०० मार्चपर्यंत असल्याचे वकिलांनी स्पष्ट केले. संचमान्यतेतील दुरुस्त्या करून पुन्हा समायोजन होईल.

– प्रमोद पवार, उपशिक्षणाधिकारी (प्रा.)

Leave a Comment