प्राथमिक शिक्षकांच्या जिल्हा परिषद अंतर्गत करावयाच्या भरतीपूर्वी बदली प्रक्रिया राबविण्याबाबत teacher request transfer
संदर्भ :-
१) उपसचिव, ग्राम विकास विभागाकडील पत्र क्रं. संकिर्ण-२०२४/प्र.क्रं.४५/आस्था-१४ दि.११/०३/२०२४
२) महाराष्ट्र शासन ग्रामविकास विभागाकडील शासन निर्णय क्रं. जिपब- २०२३/प्र.क्रं.११८/आस्था-१४ दि.१८ जून २०२४
३) मा. मुख्य कार्यकारी अधिकारी जि प सातारा यांची मान्य टिपणी दि. २४/७/२०२४
उपरोक्त संदर्भिय विषयान्वये तुम्हांस कळविणेत येते की, संदर्भ क्रं.१ च्या शासन पत्रानुसार शिक्षक संवर्गाच्याशिक्षक अभियोग्यता व बुध्दीमत्ता चाचणी परिक्षेच्या आधारे (पवित्र पोर्टलद्वारे) शिक्षक भरतीची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली असून सदर भरती प्रक्रियेतील शिक्षण सेवक यांना पदस्थापना देण्यापूर्वी शालेय शिक्षण विभागाकडील शासन निर्णय क्रं. संकिर्ण-२०२३/१७४/टिएनटि-१ दि.२१/०६/२०२३ अन्वये आवश्यक ती कार्यवाही करणे बाबत कळविलेले आहे.
संदर्भीय शासन निर्णय क्रं. २ चे अवलोकन करून, त्यामधील विहीत तरतूदीनुसार, आपले अधिनस्त कार्यरत शिक्षकांपैकी – विशेष संवर्ग भाग 1. विशेष संवर्ग भाग 2, बदली अधिकार प्राप्त व बदलीपात्र या संवर्गामध्ये पात्र शिक्षकांमधून, विनंती बदली मागणी करणाऱ्या शिक्षकांची माहिती या सोबत जोडणेत आलेल्या प्रपत्रामध्ये सादर करणेची आहे. सदर माहिती सादर करीत असताना संदर्भिय शासन निर्णयामधील तरतूदींनुसार अपात्र शिक्षकांची माहिती सादर केली जाणार नाही याची संपूर्णतः जबाबदारी आपली राहील याची नोंद घ्यावी.
विशेष संवर्ग भाग-१ मध्ये दिव्यांग कर्मचारी यांची शासन निर्णय क्रं. अप्रवि-२०१८/प्र.क्रं.४६/आरोग्य-६ दि.१४/०९/२०१८ मधील तरतूदीनुसार दिव्यांगत्वाबाबतचे ऑनलाईन युआयडी प्रमाणपत्र अर्जासोबत सादर करणे आवश्यक राहील. तसचे दिव्यांग प्रमाणपत्राबाबत संबंधित गटाचे गट विकास अधिकारी, गट शिक्षणाधिकारी व तालुका आरोग्य अधिकारी यांची त्रिस्तरीय समितीने निर्णय घेऊन अर्ज पूढील कार्यवाहीसाठी सादर करावेत.
विशेष संवर्ग भाग-२ मध्ये संबंधित शिक्षकांनी जोडीदाराच्या शाळेपासूनच्या ३० कि.मी. अंतराबाबतचा दाखला हा कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम/कार्यकारी अभियंता जिल्हा परिषद बांधकाम यांचेकडूनच घेणेत यावा. सादर केलेले प्रमाणपत्र/दाखला याची पडताळणी तालुका स्तरावर गट शिक्षणाधिकारी यांनी करावी.
बदली अधिकार प्राप्त शिक्षकांची अवघड क्षेत्रातील सलग सेवा तालुकास्तरावर गट शिक्षणाधिकारी यांनी पडताळणी करावी.
बदली पात्र शिक्षकांची सर्वसाधारण क्षेत्रातील एकूण सेवा व शाळेतील सलग सेवा तालुकास्तरावर गट शिक्षणाधिकारी यांनी पडताळणी करावी.
प्रस्तावित प्रक्रियेमध्ये विहीत मुदतीमध्ये अर्ज सादर न करणाऱ्या शिक्षकांचा बदली प्रक्रियेमध्ये विचार केला जाणार नाही व सदर बाबत कोणतीही हरकत तक्रार स्विकारली जाणार नाही.