उपरोक्त विषयाच्या अनुषंगाने शिक्षक समन्वय समिती जिल्हा परिषद, नागपूर यांचे निवेदन प्राप्त झाले आहे. जिल्हा परिषद नागपूर मध्ये पवित्र पोर्टल मधून नविन शिक्षकांची नियुक्ती झालेली आहे. २१ जून २०२३च्या शासन निर्णयानुसार जिल्हयात कार्यरत शिक्षकांना जिल्हा अंतर्गत बदलीची संधी प्रदान करण्यासंदर्भाने मार्गदर्शन करण्यात आलेले आहेत. सोबतच उपसचिव शालेय शिक्षण यांनी सुध्दा २१ जून २०२३च्या शासन निर्णय ग्रामविकास विभाग यांच्या सहमतीने निर्देशीत करण्यात आल्याचे म्हटले आहे.
नागपूर जिल्हयात पूर्वीपासून कार्यरत असणाऱ्या शिक्षकांना जिल्हातंर्गत बदलीची संधी उपलब्ध करुन देणे आवश्यक असल्याचे माझे मत आहे आणि वरील शासन निर्णय सुध्दा हेच निर्देशित करत आहे. शेजारील चंद्रपूर, वर्धा, गोंदिया इथे ही प्रक्रिया पूर्ण होत असताना नागपूर जिल्हयातील शिक्षक जिल्हातंर्गत बदलीपासून वंचित राहू नये.
तरी आपल्या स्तरावरुन जिल्हा परिषद नागपूर मधील शिक्षकांना जिल्हातंर्गत बदलीची संधी तातडीने तपासुन उपलब्ध करुन दयावी.