गुरुजींच्या बदल्यांची आशा मावळली;जानेवारीत तयार होणार नवीन बदली धोरण : जुन्याच शाळेत द्यावी लागणार सेवा teacher request transfer 

Join Now
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

गुरुजींच्या बदल्यांची आशा मावळली;जानेवारीत तयार होणार नवीन बदली धोरण : जुन्याच शाळेत द्यावी लागणार सेवा teacher request transfer 

लोकमत न्यूज नेटवर्क गडचिरोली : जिल्हा परिषद शिक्षकांच्या ऑनलाइन बदल्या करण्याचे धोरण शासनाने स्वीकारले आहे. मात्र बदल्यांच्या धोरणामध्ये काही त्रुटी असल्याने याचा फटका अनेक शिक्षकांना बसत होता. तसेच न्यायालयात दाद मागण्याचेही प्रमाण वाढले होते. त्यामुळे शिक्षकांकडूनच काही सूचना मागवून नवीन बदली धोरण तयार केले जात आहे. हे बदली धोरण पुढील वर्षी लागू होणार असल्याने यावर्षी बदल्यांची आशा मावळली आहे.

राज्यात शिक्षक या कर्मचारी वर्गाची सर्वात अधिक संख्या आहे. त्यातही गडचिरोली जिल्ह्याचा काही भाग नक्षल प्रभावित आहे.

शिक्षक काम करण्यास तयार होत नाही. परिणामी ऑफलाइन बदल्या असताना जिल्हा परिषदेत शिक्षकांची मोठी गर्दी उसळत होती. अनेक गैरव्यवहार होत होते. त्यामुळे शासनाने बदल्यांची प्रक्रिया ऑनलाइन केली. यामुळे गैरव्यवहारांवर अंकुश बसला. कोणतीही वशिलेबाजी न चालता बदल्या होण्यास सुरुवात झाली. मात्र त्यातही काही त्रुटी होत्या. काही शिक्षकांवर अन्याय होत असल्याने न्यायालयात याचिका दाखल केल्या जात होत्या. तर काही शिक्षक हा अन्याय निमूटपणे सहन करून बदली झालेल्या ठिकाणी रूजू होत होते. मात्र, आता नवीन बदली धोरण तयार केले जाणार आहे. त्यानंतर संबंधित शिक्षकाकडून माहिती मागविली जाईल. त्यानुसार बदलीची प्रक्रिया एप्रिलमध्ये होईल.

आंतरजिल्हा बदली झालेलेही अडकले

• जिल्ह्यातील काही शिक्षकांची आंतरजिल्हा बदली करण्यात आली आहे. मात्र त्यांनाही रिलिव्हर मिळत नसल्याने भारमुक्त करण्यात आले नाही.

• लोकसभेची आचारसंहिता संपताच राज्यातील इतर जिल्ह्यांमधील शिक्षकांना भारमुक्त करण्यात आले आहे.

• मात्र, गडचिरोली जिल्ह्यातील शिक्षकांना भारमुक्त करण्यात आले नाही. त्यामुळे ते शिक्षक जिल्ह्यातच अडकून आहेत.

बदल्यांमध्ये अडथळे

शिक्षकांकडूनच मागितल्या सूचना

ऑनलाइन बदल्या झाल्यामुळे बदल्यांमधील वशिलेबाजी, गैरव्यवहार यांना आळा बसला आहे. शिक्षक स्वतःच्या सॉफ्टवेअरवर माहिती भरतात. त्यांच्या माहितीवरून त्यांच्या बदलीबाबतचा निर्णय घेतला जातो. मात्र नियमांमध्ये काही चुका असल्याने त्याचा फटका शिक्षकांना बसत होता.

teacher request transfer 
teacher request transfer

Leave a Comment