सोयीच्या ठिकाणी बदलीची शिक्षकांना पुन्हा एक संधी teacher request transfer
सकाळ वृत्तसेवा छत्रपती संभाजीनगर, त्ता.९ : सोयीच्या ठिकाणी बदली
होण्यासाठी आधी दूरवर फेकल्या गेलेल्या शिक्षकांना पुन्हा एक संधी मिळणार आहे.
कार्यरत असलेल्या आणि बदलीसाठी इच्छुक असलेल्या शिक्षकांना त्यांच्या विकल्पानुसार रिक्त जागेवर समुपदेशाने बदलीची संधी देण्यात येणार आहे. ग्रामविकास विभागाने याबाबत आदेश जारी केला आहे. नवीन भरतीपूर्वी ही प्रक्रिया शिक्षण विभागाला राबवावी लागेल.
विनंती बदली शासन निर्णय pdf download
शासननिर्णय २१ जून २०२३ नुसार अशी संधी दिली जाणार आहे. सध्या नवीन शिक्षक भरती सुरू आहे. जे शिक्षक जिल्हांतर्गत बदलीसाठी इच्छुक आहेत, त्यांच्यासाठी राज्यातील सर्व मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे समुपदेशाद्वारे बदली प्रक्रिया राबवावी, अशी मागणी संघटनांकडून करण्यात आलेली आहे. मात्र, शासन आदेशानुसार कार्यवाही होत नसल्याबाबतच्या अनेक लेखी व मौखिक तक्रारी प्राप्त होत आहेत.
दि.21जून 2023 चा शासन निर्णय येथे पहा pdf download
जिल्हा परिषदेअंतर्गत नियुक्त शिक्षकांच्या बदलीबाबतच्या सुधारित अटी ग्रामविकास विभागाच्या सहमतीने २१ जूनच्या शासन निर्णयान्वये विहित करण्यात आलेल्या आहेत. या आदेशानुसार बदलीबाबत आवश्यक ती कारवाई करण्याबाबत सर्व मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद यांना आपल्या स्तरावरून निर्देश देण्यात यावे,
असे उपसचिव तुषार महाजन यांनी उपसचिव ग्रामविकास विभाग यांना कळविले आहे.