२० मेनंतर जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचा फैसला teacher request transfer
लातूर : जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचा फैसला २० मेनंतर होण्याची शक्यता सूत्रांनी वर्तवली असून, जिल्हा परिषदेच्या सामान्य प्रशासन विभागाने तयारी करून ठेवली आहे.
जिल्हा परिषदेच्या बदलीपात्र कर्मचाऱ्यांची यादी तयार असली तरी लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे त्यावर मर्यादा आल्या असून, मराठवाड्यातील सर्व आठ लोकसभा निवडणुकीचे मतदान सोमवारी (दि. १३) संपले. आता २० मेनंतर लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेतून ढिल मिळण्याची शक्यता आहे. या अनुषंगाने, जिल्हा परिषदेच्या सामान्य प्रशासन विभागाने सर्व तयारी करून ठेवली. जिल्हा परिषदेच्या बदलीपात्र कर्मचाऱ्यांना आणखी सात दिवस वाट पाहावी लागणार आहे. कर्मचाऱ्यांना बदल्यांची उत्सुकता लागून राहिली असून, एकदा
बदल्या झाले की निवांत होते; मात्र, आचारसंहितेची लक्ष्मणरेषा मधेच आल्याने कर्मचाऱ्यांना सबुरीने घ्यावे लागणार आहे. कर्मचाऱ्यांनी सोयीच्या विभागात बदल्या करून घेण्यासाठी हलचाली सुरू केल्या असून, त्यावर प्रत्यक्षात शिक्कामोर्तब होण्यासाठी वाट पाहावी लागणार आहे. जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांना बदल्यांची उत्सुकता लागून राहिली आहे. तरी सुद्धा २० मेपर्यंत वाट पाहावी लागणार आहे.