जिल्हा परिषद शिक्षकांच्या जिल्हा अंतर्गत बदल्या सन 2023-2024 teacher request transfer
संदर्भ:
– 1) महाराष्ट्र शासन ग्रामविकास विभागाकडील शासन निर्णय क्र. जिपब/4820/प्र.क्र.-290/ आस्था-14. दिनांक 7 एप्रिल 2021.
2) महाराष्ट्र शासन ग्रामविकास विभागाकडील शासन निर्णय क्र. संकिर्ण -2023/ प्र.क्र.174/टिएनटी-1/ दिनांक 21.06.2023
3) मा. शिक्षण उपसंचालक, पुणे यांचेकडील दिनांक 11/03/2024, चे पत्र,
4) उप सचिव, महाराष्ट्र शासन यांचेकडील पत्र क्रं. संकीर्ण-2023/प्र.क्र. 174/टिएनटि-1 दि. 06 मार्च 2024
5) मा. मुख्य कार्यकारी अधिकारी, जि.प. सोलापूर यांचे दिनांक 13.03.2024 रोजीचे निर्देश,
उपरोक्त संदर्भिय विषयान्वये, आपणास कळविण्यात येते की, संदर्भ क्रं. । च्या शासन निर्णयानुसार शिक्षक संवर्गाच्या ऑनलाईन पध्दतीने बदल्या करण्याबाबत शासनाने सुधारीत धोरण निश्चित केले आहे.
सदर शासन निर्णयाचे अवलोकन करुन त्यामधील विहीत तरतूदीनुसार, आपले अधिनस्त कार्यरत शिक्षकांपैकी- विशेष संवर्ग भाग-1, विशेष संवर्ग भाग-2 बदली अधिकार प्राप्त व बदलीपात्र या संवर्गामध्ये पात्र शिक्षकामधून, विनंती बदली मागणी करणा-या शिक्षकांची माहिती या सोबत जोडणेत आलेल्या प्रपत्रामध्ये सादर करणेची आहे. सदर माहिती सादर करीत असताना संदर्भिय शासन निर्णयामधील तरतूदीनुसार अपात्र
शिक्षकांची माहिती सादर केली जाणार नाही याची संपूर्णत: जबाबदारी आपली राहील याची नोंद घ्यावी. प्रस्तावित प्रक्रियेमध्ये विहीत मुदतीमध्ये अर्ज सादर न करणा-या शिक्षकांचा बदली प्रक्रियेमध्ये विचार केला जाणार नाही व सदर बाबत कोणतीही हरकत/ तक्रार स्विकारली जाणार नाही.
संदर्भ क्र. 2 ते 5 च्या अनुषंगाने आपल्या कार्यक्षेत्रातील सर्व बदली इच्छूक शिक्षकांना विविध माध्यमाद्वारे याविषयी तात्काळ सूचना देण्यात याव्यात.
सदरची माहिती या कार्यालयास सादर करणेचे अनुषंगाने आपण दिनांक-16/03/2024 रोजी सांय, 5.00 वाजेपर्यंत संबधित शिक्षकांचे अर्ज स्विकारावेत व सदर अर्जाची पात्र अपात्रेबाबत पुढील कार्यवाही करुन सदर माहितीची स्वाक्षरीत प्रत व सॉष्टकॉपी दिनांक-18/03/2024 रोजी सकाळी 11.00 वाजेपर्यंत खास दुतामार्फत या कार्यालयास सादर करणेची दक्षता घ्यावी. आपले कडील विहीत प्रपत्रातील माहिती यापुर्वी पार पडलेल्या जिल्हाअंतर्गत बदलीप्रक्रिया सन 2022-2023 कामी सादर केलेल्या माहिती प्रमाणे ENGLISH FONT मधून संवर्गनिहाय सादर करणेची आहे.
सदरचे काम कालमर्यादित असल्याने प्रथम प्राधान्याने पूर्ण करावे यामध्ये हयगय अथवा दिरंगाई होणार नाही याची दक्षता घ्यावी. सोबत:- 1) प्रपत्राची हार्डकॉपी