जि.प.शाळांना मिळणार गुरुजी ७० टक्के रिक्तपदे भरणार : गणित, इंग्रजी शिक्षकांना प्राधान्य teacher recruitment 

Join Now
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

जि.प.शाळांना मिळणार गुरुजी ७० टक्के रिक्तपदे भरणार : गणित, इंग्रजी शिक्षकांना प्राधान्य teacher recruitment 

छत्रपती संभाजीनगर, ता. १० : जिल्हा परिषदेच्या दोन हजार १२० शाळांमध्ये बिंदुनामावलीनुसार शिक्षकांची ८१६ पदे रिक्त आहेत. पण, ३० टक्के पदे रिक्त ठेवली जाणार असल्याने आणि आंतरजिल्हा बदलीतून स्वजिल्ह्यात आलेल्या शिक्षकांमुळे नवीन शिक्षक भरतीतून छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेला केवळ ५७१ शिक्षक मिळणार आहेत. या संदर्भात १५ जानेवारीपर्यंत जाहिरात प्रसिद्ध होणार आहे.

एक वर्षापूर्वी जाहीर झालेली जिल्हा परिषदांच्या शाळांमधील शिक्षक भरती अजूनपर्यंत संपलेली नाही. भावी शिक्षकांनी ‘पवित्र’वर

नोंदणी करून आता चार महिने होत असून ‘टेट’ परीक्षेलाही सहा महिने होऊन गेले. तरीदेखील नोंदणीशिवाय काहीही कार्यवाही झालेली नाही.

छत्रपती संभाजीनगरसह राज्यातील सर्वच जिल्हा परिषद शाळांनी मागासवर्गीय कक्षाकडून बिंदुनामावली अंतिम करून घेतली. त्यानंतर काही जात संवर्गासाठी जागा कमी किंवा त्या संवर्गातील पदेच रिक्त नसल्याचा आक्षेप नागपूरच्या अधिवेशनात घेण्यात आला. त्यामुळे आता एकूण रिक्त पदांपैकी ७० टक्केच पदभरतीचा निर्णय झाला आहे.

आचारसंहितेपूर्वी नियोजन लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात लागण्याची

शक्यता आहे. तत्पूर्वी, भावी शिक्षकांकडून प्राधान्यक्रम भरून घेणे आणि गुणवत्ता यादी प्रसिद्ध करून उमेदवारांना नेमणुका देण्याची प्रक्रिया २९ फेब्रुवारीपूर्वी पूर्ण करण्याचे नियोजन शालेय शिक्षण विभागाकडून सुरू असल्याचेही विश्वसनीय सूत्रांनी ‘सकाळ’ला सांगितले.

अशी राहील भरती प्रक्रिया

■ १० टक्के पदे बिंदुनामावलीवरील आक्षेपांची पूर्तता झाल्यावर भरायची आहेत. आंतरजिल्हा बदलीचा सहावा टप्पा पार पडल्यानंतर जिल्ह्यात बाहेरील जिल्ह्यातून २०० शिक्षक आले आहेत.

■ संभाजीनगर जिल्हा परिषदेकडील ९९ शिक्षक परजिल्ह्यात गेले आहेत. त्यामुळे आंतरजिल्हा बदलीतून जि. प.ला १०१ शिक्षक मिळाले आहेत. त्यांना काही दिवसांत नेमणूक दिली जाईल.

■ एकूण रिक्त शिक्षकांपैकी आंतरजिल्हा बदलीतील १०१ आणि ८१६ रिक्त पदांमधील ७० टक्के (५७१) पदे आता भरली जाणार आहे. गणित, विज्ञान व इंग्रजी विषय शिक्षकांना प्राधान्य मिळेल.

Leave a Comment