शिक्षक भरतीची जाहिरात अखेर प्रसिद्ध उमेदवारांना दिलासा; १५६ व्यवस्थापनांनी ७,७२० पदांसाठी मागविले अर्ज teacher recruitment 

Join Now
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

शिक्षक भरतीची जाहिरात अखेर प्रसिद्ध उमेदवारांना दिलासा; १५६ व्यवस्थापनांनी ७,७२० पदांसाठी मागविले अर्ज teacher recruitment 

पुणे, ता. ५ : राज्यात एकूण १५६ व्यवस्थापनांकडून तब्बल सात हजार ७२० शिक्षकांच्या पदांची जाहिरात शालेय शिक्षण विभागाने पवित्र पोर्टलवर दिली आहे. शैक्षणिक आणि व्यावसायिक अर्हता असणाऱ्या आणि पवित्र प्रणालीमध्ये नोंदणी केलेल्या पात्र उमेदवारांकडून ऑनलाइन अर्ज मागविण्यात आले आहेत. बहुप्रतीक्षेत असणाऱ्या शिक्षक भरतीतील किमान काही जागांची जाहिरात निघाल्याने हजारो उमेदवारांना दिलासा मिळाला.

‘अभियोग्यता व बुद्धीमत्ता चाचणी २०२२’ या परीक्षेत प्रविष्ट झालेल्या उमेदवारपैिकी पवित्र प्रणालीमध्ये

वैयक्तिक माहिती नोंदवून स्वप्रमाणित केलेल्या उमेदवारांना जाहिरातीनुसार ऑनलाइन अर्ज करता येणार आहे. संबंधित पात्र उमेदवारांना पात्र असलेल्या पदांसाठी पसंतीक्रम नमूद करून पोर्टलवर ऑनलाइन अर्ज करता येणार आहे. जिल्हा परिषदेच्या केंद्र शाळा स्तरावर केंद्रातील अन्य शाळांमधील शिक्षकांना इंग्रजी भाषेच्या अध्यापनाचे तंत्र शिकविण्यासाठी नियुक्त केंद्र शालास्तरावर एक शिक्षक याप्रमाणे इंग्रजीतून शिक्षण झालेल्या उमेदवारांमधून हे पद भरण्यात येणार आहे. परंतु, त्याला मराठी माध्यमाच्या उमेदवारांनी विरोध केला आहे.

राज्यातील १४ जिल्हा परिषदा, १५ नगरपालिका आणि दोन 66 महानगरपालिका यांच्यासह १२५ खासगी व्यवस्थापन अशा एकूण १५६ व्यवस्थापनांकडून सात हजार ७२० शिक्षक पदांची जाहिरात देण्यात आली आहे. या व्यवस्थापनांकडून पवित्र पोर्टलवर जाहिरात देण्याची कार्यवाही सध्या सुरू आहे. यात मराठी माध्यमाच्या शाळांसाठी सहा हजार ८४५ शिक्षकांच्या पदांच्या भरतीची जाहिरात निघाली आहे. माध्यमनिहाय बिंदूनामावली असल्याने इंग्रजी माध्यमांच्या शाळांसाठी स्वतंत्र जाहिराती असतात. – सूरज मांढरे, राज्याचे शिक्षण आयुक्त

राज्यातील विविध व्यवस्थापनांच्या शिक्षक भरतीची जाहिरात पवित्र ८८ पोर्टलवर अपलोड करण्याचे काम सुरू आहे. अद्याप पूर्ण जाहिराती अपलोड झाल्या नाहीत. त्यात इंग्रजी माध्यमाच्या मुलांसाठी वेगळी जाहिरात देण्याचा घाट सरकारने घातला आहे. त्यामुळे गुणवत्ताधारकांवर अन्याय होणार आहे.

– संतोष मगर, संस्थापक अध्यक्ष, डी. टी. एड. बी. एड. स्टुडंट असोसिएशन

८८ जाहिरात अधिकृतरीत्या प्रसिद्ध झाल्याने आनंद होत आहे. परंतु, इंग्रजी माध्यमाच्या उमेदवारांना मराठी, सेमी इंग्रजी आणि इंग्रजी माध्यमातील शिक्षक पदांसाठी पात्र केल्याने त्यांना जास्त संधी मिळणार असून, मराठी माध्यमाच्या उमेदवारांवर अन्याय होणार आहे. खासगी संस्थांच्या जाहिराती पुढील टप्प्यात येणार असल्याने शिक्षक भरती फसवी होणार की काय, असा प्रश्न पडत आहे.

– संदीप कांबळे, अध्यक्ष, युवा शैक्षणिक व सामाजिक न्याय संघटना

Teacher recruitment
Teacher recruitment

Leave a Comment