प्राथमिक शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदली प्रक्रियेत किमान सेवेची अट ठेवू नका ! Teacher Intra district transfer 

Join Now
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

प्राथमिक शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदली प्रक्रियेत किमान सेवेची अट ठेवू नका ! Teacher Intra district transfer

विनाअट बदली प्रक्रिया राबवा; शिक्षक सहकार संघटनेची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्क सोलापूर: प्राथमिक शिक्षकांच्या

जिल्हांतर्गत बदली प्रक्रियेत किमान सेवेची अट ठेवू नका अशी मागणी करीत विनाअट बदली प्रक्रिया राबविण्याची मागणी शिक्षक सहकार संघटनेने केली आहे. याबाबतचे निवेदन शिक्षणाधिकारी कादर शेख यांच्याकडे सोमवारी देण्यात आले.

जिल्हा परिषदेकडून १४ मार्च रोजी प्राथमिक शिक्षकांची जिल्हांतर्गत बदली प्रक्रिया राबविण्यासाठी पत्र काढण्यात आले आहे. ग्रामविकास विभागाच्या बदली प्रक्रिया राबविण्याबाबतच्या ११ मार्च २०२४ च्या पत्रानुसार, शिक्षक बदल्याबाबत २१ जून २०२३ च्या सुधारित शासन निर्णयानुसार जिल्हांतर्गत बदली

प्रक्रिया ही जिल्हांतर्गत बदलीसाठी जे शिक्षक पूर्वीपासून कार्यरत आहेत, त्यांच्यापैकी बदली इच्छुक शिक्षकांना त्यांच्या विकल्पानुसार एक संधी देऊन जागा रिक्त असल्यास समुपदेशनाद्वारे रिक्त पदी नियुक्ती द्यावी असे म्हटले आहे.

ही नियुक्ती देताना सेवेची अट

किती असावी याबाबत कोणतीही अट ठेवण्यात आली नाही. त्यानुसार बदली इच्छुक सर्वांना संधी मिळावी म्हणजे सर्व शिक्षक बदलीपात्र होतील असेही निवेदनात म्हटले आहे.

यावेळी शिक्षक सहकार संघटनेचे राज्य सरचिटणीस नीलेश देशमुख, जिल्हाध्यक्ष रविराज खडाखडे, जिल्हा उपाध्यक्ष रवींद्र जेटगी, जिल्हा सरचिटणीस सचिन निरगिडे, जिल्हा संघटक विशाल नाईक, संभाजी शेलार, सागर सोनवणे, दादासाहेब जगताप, संजय कांदे, सुनील मुंढे, उमेश मुंढे, भारत जावीर, रतिलाल शेजाळ, दामाजी माळी, राजीव लोंढे, सतीश कांबळे, सचिन गीर, सिद्धण्णा कोळी, भारत राठोड, हनुमंत सुभेदार, महादेव डोईफोडे उपस्थित होते.

Teacher Intra district transfer
Teacher Intra district transfer

Leave a Comment