दोन कोटींचा चेक वटविण्याचा प्रयत्न करणाऱ्या सागरला अटक :शिक्षक बँक, कारवाईला वेग teacher bank
लोकमत न्यूज नेटवर्क अमरावती : येथील जिल्हा परिषद शिक्षक बँकेचा दोन कोटी रुपयांचा धनादेश एसबीआयमध्ये जाऊन वटविण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी, घटनेपासून फरार असलेल्या सागर शिंदे (२८, रा. यवतमाळ) नामक आरोपीला शनिवारी (दि. ९) धामणगाव रेल्वे येथून अटक करण्यात आली. त्याच्या अटकेमुळे एकूण आरोपींची संख्या तीनवर पोहोचली आहे. यापूर्वी १ मार्च रोजी विक्रांत भूपेंद्रसिंह ठाकूर (३१, रा. मसानगंज, अमरावती) व सूरज अर्जुनसिंह ठाकूर (३५, रा. यवतमाळ) यांना अटक करण्यात आली, तर सागर शिंदे (रा. यवतमाळ) हा फरार होता. विक्रांत व सूरजच्या कबुलीतून सागर शिंदेचे नाव उघड झाले होते.
शिक्षक बँकेच्या हमालपुरा येथील मुख्य शाखेतून करंट खात्याचा ९९३५५९ क्रमांकाचा धनादेश चोरून स्टेट बँक ऑफ इंडियाच्या कॅम्प
येथील शाखेतून तब्बल दोन कोटी रुपये काढण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. १५ फेब्रुवारी रोजी दुपारी ती घटना घडली होती. याप्रकरणी २७
फेब्रुवारी रोजी तपासाअंती गाडगेनगर
पोलिसांनी दोन अज्ञातांविरुद्ध गुन्हा
दाखल केला होता. तपासादरम्यान,
विक्रांत ठाकूर व सूरज ठाकूरला अटक
करण्यात आली. विक्रांत हा शिक्षक
बँकेच्या यवतमाळ येथील शिक्षक
बँकेच्या शाखेत लिपिक म्हणून कार्यरत
आहे. त्याच्या कबुलीने विद्यमान बैंक
अध्यक्ष गोकुलदास राऊत, त्यांची
शाखा व्यवस्थापक असलेली मुलगी व
अन्य एक संचालक संशयाच्या
भोवऱ्यात आले आहेत. त्या
धनादेशावरील स्वाक्षऱ्या खऱ्या आहेत,
तो धनादेश आपल्याला गोकुलदास
राऊत यांनीच वटविण्यासाठी दिला
होता, असा आरोप करून अटक
आरोपी विक्रांतने संशयाची राळ
उडवून दिली आहे. त्यामुळे बँक
अध्यक्षांसह अन्य एक संचालक, शाखा
व्यवस्थापक,
सरव्यवस्थापक,
उपसरव्यवस्थापक यांच्यासह अनेक
जण पोलिसांच्या रडारवर आले आहेत.