शिक्षक पुरस्कार वादाच्या भोवऱ्यात

Join Now
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

शिक्षक पुरस्कार वादाच्या भोवऱ्यात

मुंबई वृत्त:-समर्पित वृत्तीने काम करणाऱ्या शिक्षकांना राज्य सरकार तर्फे दरवर्षी पाच सप्टेंबर रोजी शिक्षक दिनाचे औचित्य साधून क्रांतीज्योती सावित्रीबाई राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येते शिक्षण विभागाकडून यंदा निवड करण्यात आलेल्या शिक्षकांची यादी जाहीर केली आणि त्यानुसार त्यानंतर राज्यातील विविध भागात या यादीवर अक्षय घेण्यात सुरुवात झाली मुंबई लगत असलेल्या ठाणे जिल्ह्यातील ग्रामीण भागातून आणि मराठवाडा येथील ग्रामीण भागातील शिक्षकांची यादी तयार करताना निकष डावलण्यात आले असल्याची तक्रार काही शिक्षकांकडून करण्यात आली आहे त्यामुळे शिक्षकांनी संताप व्यक्त केला आहे महाराष्ट्र टीचर अवार्ड 2023 राज्य सरकारकडून प्राथमिक माध्यमिक आदिवासी विभाग यासारख्या सात प्रवर्गातील एकूण 108 शिक्षकांचे गुणगौरव पुरस्कारासाठी निवड केली जाते आदिवासी विभाग या वर्गातून पूर्णतः व अंशतः आदिवासी १९ जिल्ह्यांमधून 16 शिक्षकांचा खास पुरस्कार देऊन सन्मान केला जातो ही निवडणूक वेगवेगळ्या 17 निकषांच्या आधारे केली जाते मात्र ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यातील शिक्षकाला देण्यात आलेल्या पुरस्कारासाठी निकष बदलण्यात आले असल्याची तक्रार शिक्षकांनी केली आहे अशीच एक तक्रार अक्कलकोट मधील जय भाऊ पारखे यांनी केले आहे त्यामुळे या संपूर्ण निवड पद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहेत आपल्या जवळच्या लोकांना पुरस्कार देण्यात आला असल्याचा आरोप देखील पारखे यांनी केला आहे त्यामुळे येणाऱ्या काळात या सर्व निवड प्रक्रियांची चौकशी करण्याची मागणी शिक्षकांकडून करण्यात आली आहे तर आश्चर्य व्यक्त करायला नको अशी परिस्थिती निर्माण झाली आहे ठाण्यातील शहापूर तालुक्यातील आदिवासी भागातील शिक्षकाला देण्यात आलेल्या पुरस्कार संदर्भात काही प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत आदिवासी गटातून पुरस्कार देताना संबंधित शिक्षकांची सेवा किमान नऊ वर्ष त्या शाळेत झालेली असावी मात्र शहापूर तालुक्यातील शिक्षक 2023 मध्येच ऑनलाईन बदली घेऊन आले आहे आणि त्याला संबंधित पुरस्कार जाहीर झाला आहे त्यामुळे त्या ठिकाणी असलेल्या आणि अर्ज केलेल्या शिक्षकांनी नाराजी व्यक्त केली आहे.

Leave a Comment