अशा लोकांपासून नेहमी सावध रहा सुंदर लेख sundar lekha
आपल्यावर जळणाऱ्या लोकांबद्दल. जर तुमच्यावर जळणारे लोक आसतील किंवा तुम्हाला कोणी छुपा शत्रू असेल तर शक्यता आहे की तुम्ही आयुष्यात मोठं काहीतरी करत नाही.
तुम्हाला अशा लोकांबद्दल सहानुभूती निर्माण होईल.
पण स्वतःचा अभिमान वाटेल आणि मग तुम्हाला कधीच हा प्रश्न पडणार नाही की माझ्यावर लोक का जळतात?
तुमच्यावर लोक जळतात कारण ते तुमच्या लेव्हल पर्यंत येऊ शकत नाही. तुमच्या जळणारे लोकं ही सर्वच बाबतीत तुमच्यापेक्षा कमी असतात. मग ते आर्थिक स्तरावर कमी असतील, बुद्धीमध्ये कमी असतील, तुमच्यापेक्षा कामांमध्ये कमी असतील, तुमच्यापेक्षा कमी आनंदी असतील थोडक्यात ज्यांच्या आयुष्याची सर्वच बाजूने वाट लागलेली असते. ते आपल्यापेक्षा चांगल्या लोकांवर नेहमी जळतात. त्यामुळे तुमच्यावर कोणी जळत असेल तर काळजी करायची कारण नाही. कारण तुम्ही अशा लोकांपेक्षा आयुष्यात काहीतरी चांगले करत आहात.
तुमच्यावर जळणारे लोकं तुमच्यासारखे बनण्याचा प्रयत्न करतात. पण ते दाखवत नाही. लोक तुमच्यावर जळतात कारण ते तुमच्यासारखे नाहीये. पण मनातल्या मनात त्यांची इच्छा असते की ते तुमच्यासारखे बनवं. या लोकांना नेहमी वाढत असते की त्यांच्या आयुष्यात तुमच्या सारख असाव. त्यांची नाती तुमच्यासारखी असावी. त्यांची यश तुमच्यासारखे असावे. त्यांना नेहमी असं वाटत असते की तुमच्या सारखे खुश राहावे. म्हणून हे लोक तुमच्यावर जळतात. कारण तुमच्याकडे असे काहीतरी आहे हे त्यांच्याकडे नाहीये. जर तुम्ही ही गोष्ट ध्यानात घ्याल तर तुमच्यावर जळणाऱ्या लोकांच्या बोलण्याचा त्रास होणार नाही.
तुमच्यावर जळणारी लोकं तुमचे सगळे सोशल मीडिया अकाउंट खूप बघतात. हा किती विचित्रपणा आहे की, तुमच्यावर जळणारे लोकं तुमचे फेसबुक, व्हाट्सअप चे अकाउंट सारखे सारखे बघतात. आणि अजून जळतात. ते तुमचा प्रत्येक फोटो बघतात. त्यांना असे वाटेल तुमच्या आयुष्यात काहीतरी गडबड आहे आणि तुम्ही सुद्धा त्यांच्यासारखी उदास व्हावे. त्यामुळे त्यांच्या मनाला खोटी शांती मिळेल की फक्त तेच उदास नाही तुम्ही सुद्धा आयुष्यामध्ये उदास आहात. थोडक्यात हे लोक तुमच्या सोशल मीडिया अकाउंट वर नेहमी नजर ठेवून असतात. फोटोला काही कमेंट देत नाही याचा अर्थ तुमच्यावर जळणारे तुमचे सगळ्यात मोठे चहाचे असतात.
नेहमी तुमच्या मित्रांमध्ये तुमच्याबद्दल चर्चा करत असतात. मित्रांनो हे लोक नेहमी तुमच्या मित्रांबरोबर गप्पा मारताना तुमचे नाव घेत असतात. त्यामुळे तुम्हाला अशा लोकांना धन्यवाद दिले पाहिजे. कारण ते तुम्हाला प्रसिद्धी मिळून जातात. तुम्हाला नाव ठेवणारे तुमचे चाहते वाढवायला सुद्धा मदत करतात.
तुमच्यावर जळणारे नेहमी तुम्हाला प्रगतीसाठी प्रोत्साहन देतात. मित्रांनो विचार करा तुमच्यावर जळणारे हे तुम्हाला प्रगतीसाठी प्रोत्साहन देतात करा. तुमच्यावर जळणारे लोक तुमच्यात असलेला दोषांची आपल्याला माहिती देत असतात. आता ते जे काही दोष असतात त्यांची तुम्ही जरी यादी बनवली आणि प्रत्येक दोष ज्याच्यामध्ये तथ्य आहे त्याच्यावर तुम्ही काम करायला सुरुवात केली. तुमची किती प्रगती होऊ शकते. तुम्ही किती उंचीवर जाऊ शकता. आपले जवळचे नेहमी आपले दोष पोटात घ्यायचा प्रयत्न करतात. पण जेव्हा कोणी तुम्हाला म्हणते तुला हे जमणार नाही तू मूर्ख आहे. तू कधीच करू शकणार नाही. तेव्हा तुमच्या मध्ये जी आग निर्माण होते ती तुम्हाला नाव ठेवणारी लोकच निर्माण करू शकतात आणि हेच गोष्ट एका तुकाराम महाराजांचा अभंग मध्ये सांगितलेले आहे.
तुमच्या लोक जळतच राहणार. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा. आयुष्यात तुम्ही काहीही केले तरी काही लोक तुमच्यावर जळत राहणारच. तुम्ही या जगात प्रत्येकाला खुश ठेवू शकत नाही. सगळ्यांना खुश ठेवायचा प्रयत्न करणं म्हणजे आपण आपली अधोगती करून घेणे. पण मला असे वाटते ज्या गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या आहेत त्यानंतर अशा लोकांचा तुमच्यावर परिणाम होणार नाही आणि बारकाईने पाहिले तर अशी लोकं तुमच्यासाठी एक प्रकारे वरदानच आहे.
@अनामिक @….