विषय शिक्षकांच्या विनंती बदली प्रक्रिया सन 2024 बावत subject teacher transfer 

Join Now
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

विषय शिक्षकांच्या विनंती बदली प्रक्रिया सन 2024 बावत subject teacher transfer

संदर्भ :-१. शासन निर्णय क्रमांक जिपब-४८२०/प्र.क्र.२९०/आस्था-१४/दि.०७ एप्रिल २०२१

२. शासन निर्णय क्रमांक संकिर्ण-२०२३/प्र.क्र.१७४/टिएनटी-१दिनांक २१ जुन २०२३

३. मा.उप सचिव महाराष्ट्र शासन यांचे पत्र क्र. जिपब-२०२२/प्र.क्र.२९/आस्था-१४/दि.२३/११/२२

४. विविध संघटनेचे निवेदन

उपरोक्त संदर्भीय क्र. २ अन्वये “जिल्हा अतंर्गत बदलीसाठी जे शिक्षक पूर्वीपासुन कार्यरत आहेत त्यांच्यापैकी बदली इच्छुक शिक्षकांना त्यांच्या विकल्पानुसार एक संधी देऊन जागा रिक्त असल्यास समुपदेशनाद्वारे रिक्त पदी नियुक्ती देण्यात यावी. समुपदेशनापूर्वी संभाव्य भरण्यात येणारी नवीन पदे विचारात घ्यावी व शाळास्तरावर समान शिक्षक राहतील” यांची दक्षता घेण्याचे सुचित करण्यात आले आहे.

उक्त शासन निर्यणयाच्या अनुषंगाने विषय शिक्षकांच्या विनंती बदली प्रक्रियेसाठी दि.१५-०३-२०२३ रोजी गुगल फार्म प्रसिध्द करण्यात आला होता. त्याद्वारे विनंती बदलीसाठी इच्छुकांनी लिंक भरुन माहिती या कार्यालयास प्राप्त झाली आहे. उक्त प्राप्त माहितीच्या आधारे या कार्यालयाकडून तपासणी अंती सेवाजेष्ठता यादी तयार करण्यात येणार आहे.

तथापी ज्या इच्छूक लिंक भरलेल्या विषय शिक्षकांनी उक्त माहितीच्या आधारे सदर शिक्षकास जर बदली हवी असेल तरच पत्रासोबत दिलेला विनंती अर्ज संबंधीताकडून आपणाकडे लेखी स्वरुपात घेण्यात यावा. सदर विनंती अर्जामध्ये शिक्षकांनी बदली हवी असल्याचा विकल्प दिला असल्याची खात्री करुन घ्यावी.

जे शिक्षक विनंती बदलीचा अर्ज देणार नाहीत. त्यांचा विचार बदली प्रक्रियेमध्ये केला जाणार नाही. तसेच ज्यां विनंती बदली इच्छूक शिक्षकांनी अर्ज दिला आहे. त्यांचा अर्ज कोणत्याही परिस्थितीत मागे घेता येणार नाही किंवा बदलीस नकार देता येणार नाही.

संदर्भ क्र.२ अन्वये विनंती अर्ज भरलेल्या शिक्षक संख्येनुसार तालुक्यातील रिक्त पदाचे समानीकरण विचारात घेऊन समुपदेशनाद्वारे पदस्थापना देण्यात येईल.

अर्जामध्ये नमुद केलेल्या संवर्गाच्या अनुषंगाने संदर्भीय शासन निर्णय क्र.१ मधील नमुद कागदपत्रे सोबत जोडून संबंधीताचा बदली बिनंती आपणाकडे दि.१६/०३/२०२४ रोजी दुपारी १२ वाजेपर्यंत स्विकारून दुपारी २ वाजेपर्यंत तपासणी करुन दुपारी ३.०० वाजेपर्यंत जिल्हास्तरावर सादर करावेत.

subject teacher transfer
subject teacher transfer

Leave a Comment