समग्र शिक्षा मोफत गणवेश योजना 2024-25 अंमलबजावणी बाबत student uniform guidelines 

Join Now
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
student uniform guidelines
student uniform guidelines

समग्र शिक्षा मोफत गणवेश योजना 2024-25 अंमलबजावणी बाबत student uniform guidelines 

संदर्भ: 1. म.प्रा.शि.प. मुंबई यांचे मार्गदर्शक सुचना पत्र. मप्राशिप/सशि/गणवेश/1088 दि. 22-03-2024

2. म.प्रा.शि.प. मुंबई यांचे पुरवठा आदेश. मप्राशिप/सशि/गणवेश/22023-24/799 दि. 07-03-2024 3. म.प्रा.शि.प., मुंबई यांचे पुरवठा आदेश. मप्राशिप/सशि/गणवेश/2023-24/903 दि. 13-03-2024

वरिल विषयी कळविण्यात येते की, समग्र शिक्षा व राज्य शासन मोफत गणवेश योजना सन 2024-25 च्या अनुषंगाने महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद, मुंबई यांचेकडुन योजना अंमलबजावणी बाबत मार्गदर्शक सुचना प्राप्त झाल्या आहेत. सन 2024-25 समग्र शिक्षा व राज्य शासन मोफत गणवेश योजनेमधुन शासकिय व स्थानिक स्वराज्यसंस्थेच्या शाळामधिल इयत्ता 1 ते 8 च्या सर्व विद्यार्थ्यांना गणवेश पुरवठा करण्यात येणार आहे.

सन 2024-25 मोफत गणवेश योजना अंमलबजावणीचे स्वरुप खालिलप्रमाणे असणार आहे.

1. सन 2024-25 मध्ये गणवेश खरेदी SMC स्तरावर करण्यात येणार नाही. राज्यस्तरावरुन पुरवठा करण्यात येणार आहे.

2. संदर्भ क्र. एक येथील आदेशानुसार राज्यस्तरावरुन पदमचंद मिलापचंद जैन, यांना गणवेश कापड पुरवठा आदेश देण्यात आलेले आहेत. त्यानुसार संबंधित पुरवठादाराकडुन तालुकास्तरावर गणवेश कापडाचा पुरवठा करण्यात येणार आहे. गणवेश कापड पुरवठा करणेबाबत सविस्तर सुचना संदर्भ क्र. 1 येथील पत्रात दिल्या आहेत. (प्रत संलग्न) 3. संदर्भ क्र. दोन येथील आदेशानुसार राज्यस्तरावरुन व्यवस्थापकिय संचालक, महिला आर्थिक विकास

महामंडळ, मुंबई यांना गणवेश शिलाई करुन देण्यासाठी पुरवठा आदेश देण्यात आलेले आहेत. त्यानुसार संबंधित पुरवठादाराकडुन गटस्तरावरील समिती, मार्फत गणवेश कापड हस्तगत करुन गणवेश शिलाई करुन देण्यात येणार आहे. गणवेश शिलाई बाबत सविस्तर सुचना संदर्भ क्र. 2 येथील पत्रात दिल्या आहेत. (प्रत संलग्न) 4. गणवेश शिलाई साठी व्यवस्थापकिय संचालक, महिला आर्थिक विकास महामंडळ, मुंबई यांना दिलेल्या आदेशानुसार महिला आर्थिक विकास महामंडळ मार्फत जिल्हास्तरावरील लोकसंचलित साधन केंद्रांतर्गत स्थानिक स्तरावरील महिला बचत गटाद्वारे गणवेश शिलाई करुन लोकसंचलित साधनकेंद्रामार्फत तयार गणवेशाचा पुरवठा शाळास्तरावर करण्यात येणार आहे.

5. सन 2024-25 समग्र शिक्षा व राज्य शासन मोफत गणवेश योजना अंमलबजावणीच्या अनुषंगाने सविस्तर मार्गदर्शक सुचना संदर्भ क्र. तिन येथील पत्रात देण्यात आलेल्या आहेत. (प्रत संलग्न) त्यानुसार आवश्यक कार्यवाही गटशिक्षाणाधिकारी स्तरावरुन होणे अपेक्षित आहे.

सन 2024-25 समग्र शिक्षा व राज्य शासन भोफत गणवेश मोफत योजना प्रभावी अंमलबजावणी

करण्यासाठी खालीलप्रमाणे कार्यवाही करावी.

1. राज्यस्तरावरुन देण्यात आलेल्या पुरवठा आदेशानुसार आपल्या तालुक्यातील गणवेश लाभार्थी संखेनुसार (UDISE 2022-23) मायक्रो कटिंग केलेल्या कापडाचा पुरवठा सिलबंद बॉक्समधुन BRC अथवा लोकसंचलित साधन केंद्र येथे करण्यात येणार आहे. गणवेश कापड हस्तगत करण्यासाठी संदर्भ क्र तिन येथील पत्रात नमुद केल्यानुसार समिती तात्काळ गठित करावी.

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, शासन निर्णय क्र. एसएसए-1220/प्र.क्र.154/एसडी-3, दि.08.06.2023 द्वारे राज्य शासनाने सन 2024-2025 या शैक्षणिक वर्षात राज्यांतील शासकीय स्थानिक स्वराज्य संस्थेच्या शाळांमध्ये इयत्ता 1 ली ते 8 वीच्या वर्गांमध्ये शिक्षण घेत असलेल्या पात्र लाभार्थी विद्यार्थी व विद्यार्थीनींना मोफत गणवेश उपलब्ध करून देण्याबाबतचा धोरणात्मक निर्णय घेतला आहे. या शासन निर्णयाद्वारे एकूण 44,60,004 विद्यार्थी व विद्यार्थीनीना प्रत्येकी 2 शालेय गणवेश प्रदान करण्यात येणार असून या गणवेशापैकी एक गणवेश स्काऊट व गाईडशी अनुरूप असून अन्य गणवेश हा आकाशी रंगाचा शर्ट व गडद निळा रंगाची हाफ फुल पैंट व मुलींना आकाशी रंगाचा शर्ट व गडद निळ्या रंगाचा स्कर्ट, तसेच इयत्ता 8वीच्या मुलींना सलवार कमीज आहे. तसेच या गणवेशाची शिलाई स्थानिक महिला आर्थिक विकास महामंडळाच्या अधिनस्त महिला बचत गटामार्फत देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्या अनुषंगाने महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद कार्यालयामार्फत ईनिविदा प्रक्रिया राबविण्यात आली असून ईनिविदा प्रक्रियेअंती पुरवठादराची नियुक्ती करण्यात आली असून पुरवठा आदेश दि.04.03.2024 रोजी निर्गमित करण्यात आला आहे.

त्या अनुषंगाने शालेय गणवेशाच्या शिलाईबाबत महिला आर्थिक विकास महामंडळास खालीलप्रमाणे कार्यारंभ देण्यात येत आहे.

2. गणवेश कापडाचे बॉक्स प्राप्त करुन घेताना प्रत्येक बॉक्सवर टेक्सटाईल कमीटीचे सिल असल्याचे, सिलवर लिहिलेली सर्व माहिती व्यवस्थित कोणतीही खाडाखोड नसलेली असल्याची खात्री करुन घ्यावी. बॉक्सवर संदर्भिय पत्रात नमुद केल्यानुसार माहिती नसल्यास असे कापड बॉक्स हस्तगत करु नये. पुरवठादारास परत करावे.

3. पुरवठा झालेले गणवेश कापड सुस्थितीत ठेवण्यासाठी योग्य अशी जागा निश्चित करुन ठेवावी. कापड चोरीला जाणार नाही, अवेळी पडणा-या पावसाने भिजणार नाही अथवा उंदीर, घुशी कुरतडणार नाहीत अशी सुरक्षित जागा निवडावी.

4. गणवेश कापडाचे बॉक्स प्राप्त झाल्यानंतर लोकसंचलित साधन केंद्र यांचे सुचनेनुसार महिला बचत गटांना गणवेश शिलाई करण्यासाठी देण्यात यावे. महिला बचत गटांना देण्यात आलेले कापड व त्यांनी शिलाई करुन दिलेले गणवेश याची नोंद ठेवण्यात यावी तसेच योग्य प्रकारे पोंच घ्यावी.

5. गणवेश कापड प्राप्त होताच प्राप्त गणवेश कापडाच्या विवरणासह माहीती जिल्हा कार्यालयास सादर करावी.

6. सन 2024-25 समग्र शिक्षा व राज्य शासन मोफत गणवेश योजना अंमलबजावणीच्या अनुषंगाने राज्य कार्यालयाकडुन प्राप्त संदर्भिय आदेश / मार्गदर्शक सुचना पत्र यांच्या प्रती या सोबत, जोडुन देण्यात येत आहेत. त्याचे काळजिपुर्वक अवलोकन करावे. संदर्भिय आदेश/ मार्गदर्शक सुचना पत्र यामधिल निर्देश व सुचनांचे काटेकोरपणे पालन करावे.

सन 2024-25 समग्र शिक्षा व राज्य शासन मोफत गणवेश योजना अंमलबजावणीच्या अनुशंगाने उपरोक्त प्रमाणे कार्यवाही वेळेत करावी. केलेल्या कार्यवाहीचा वेळोवेळी अहवाल सादर करावा.

शालेय गणवेश याबाबत मार्गदर्शक सूचना येथे पहा

कार्यारंभ आदेश

सन 2024-2025 या शैक्षणिक वर्षात राज्यातील शासकीय स्थानिक स्वराज्य संस्थेच्या शाळांमधील 44,60,004 पात्र लाभार्थी विद्यार्थी व विद्यार्थीनींना पुरवठा करावयाच्या शालेय गणवेश शिलाई करण्याचे काम या आदेशाद्वारे व्यवस्थापकीय संचालक, महिला आर्थिक विकास महामंडळ यांना देण्यात येत आहे. सदरहू आदेश खालील अटी व शर्तीच्या अधीन राहून देण्यात येत आहेत,

जवाहर आम बबन पेशिस्त वाजलेला, तो सुबक वर्ग चर्नी रोड (प.), मुंबई – ४०० ००४. टेलिफोन नं.: ०२२-२३६३६३१४, २३६७ ९२६७, २३६७ १८०८, २३६७१८०९, २३६७ ९२७४

ई-मेल: mpspmah@gmail.com, samagra-shiksha@mahedu.gov.in

संकेतस्थळ – https://samagrashiksha.maharashtra.gov.in, https://mpsp.maharashtra.gov.in

1. व्यवस्थापकीय संचालक, महिला आर्थिक विकास महामंडळ यांनी सादर केलेल्या दि.01.03.2024 रोजीच्या पत्रातील विनंतीनुसार गणवेशाच्या कापडाचे मायक्रो कटींग करून त्याप्रमाणे पुरवठा करण्यात येईल.

2. महिला आर्थिक विकास महामंडळाच्या मागणीनुसार प्रत्येक इयत्तेच्या गणवेशासाठी लागणाऱ्या कापडाचे मायक्रो कटींग करून पुरवठा करण्यात येणार असल्याने त्यानुसार शिलाई करतेवेळी सदर शिलाई Standard मापाप्रमाणे करण्याबाबत योग्य ती खबरदारी घेण्यात यावी.

3.

गणवेश शिलाईकरिता प्रतिगणवेश रू.110/- (सर्व अनुज्ञेय करांसहित) या दराने मोबदला अदा करण्यात येईल. या

दराव्यतिरिक्त अन्य कोणतेही चार्जेस/कर अनुज्ञेय राहणार नाहीत.

4. शालेय गणवेशाच्या कापड पुरवठादाराकडून प्रत्येक तालुक्यातील गट अथवा शहर साधन केंद्रावर त्या गटातील शाळांमधील सर्व पात्र लाभार्थी विद्यार्थी व विद्यार्थीनींना प्रदान करावयाच्या गणवेशाचे कापड पुरवठा करण्यात येईल. गट केंद्राऐवजी महिला आर्थिक विकास महामंडळाने काही ठिकाणी अन्य लोक संचालित साधन केंद्रावर पुरवठा करण्याचे सुचविल्यास त्यानुसार सुधारित पत्त्यावर कापड पुरवठा करण्यात येईल.

5. गणवेशाच्या कापडाच्या जिल्हानिहाय पुरवठाबाबतचा प्राधान्यक्रम राज्य प्रकल्प संचालक, महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद आणि महिला आर्थिक विकास महामंडळ यांच्याशी चर्चेनुसार निश्चित करण्यात येईल.

6. शालेय गणवेशाच्या कापडाचा पुरवठा गट/शहर साधन केंद्र/ लोक संचालित साधन केंद्र यावर पुरवठा स्विकारण्याकरिता खालीलप्रमाणे समिती गठीत करण्यात येत आहे

8. गणवेशाच्या कापडाचा पुरवठा झाल्यापासून 2 महिन्यांच्या कालावधीत गणवेशाचा पुरवठा करण्याची दक्षता घेण्यात यावी.

9. शिलाई अंती तयार गणवेशाचा पुरवठा संबंधित शाळांना झाल्यानंतर शिलाईच्या दर्जाबाबत काही तक्रार प्राप्त झाल्यास सदरहू तक्रारीचे निराकरण करण्याची व शिलाईमधील दोष दुरूस्त करण्याची जबाबदारी व्यवस्थापक, महिला आर्थिक विकास महामंडळाची राहील.

10. शिलाईचा दर्जा उत्तम राहण्याबाबत सर्वतोपरी खबरदारी घेण्यात यावी.

11. शिलाई कालावधीत पुरवठा केलेल्या कापडाला कोणताही डाग लागू नये अथवा अन्य कोणत्याही प्रकारे कापड खराब होऊ नये, याबाबत आवश्यक दक्षता घेण्यात यावी.

12. गट/शहर साधन केंद्रावर अथवा लोक संचालित साधन केंद्रावर कापडाचा पुरवठा स्वीकार करण्यापूर्वी सदरहू कापड सुस्थितीत आहे अथवा कसे, पुरवठा केलेल्या बॉक्सवर टेक्सटाईल कमिटी, मुंबई यांचे सील आहे किंवा कसे, सदर बॉक्सच्या बाह्यभागावर आतमध्ये पुरवठा केलेले कापड कोणत्या इयत्तेचे विद्यार्थी अथवा विद्यार्थीनींकरिता आहे, तसेच त्यामध्ये प्रतिगणवेश किती तुकडे आहेत इ. बाबतची सुस्पष्ट माहिती बॉक्सच्या बाह्य भागावर लिहिलेली आहे किंवा कसे व त्यानुसार प्रत्यक्ष मालाचा पुरवठा झाला किंवा कसे, या बाबींची काटेकोरपणे तपासणी आवश्यक आहे.

गणवेश या बाबत सर्व शासन निर्णय पीडीएफ येथे पहा pdf download 

Leave a Comment