आयसर पात्रता परीक्षेसाठी आजपासून करा अर्ज start iiser admission
पुणे, ता. १ : विज्ञानात तुम्हाला भन्नाट करिअर करायचे असेल तर आजच आयसर अॅप्टिट्यूड टेस्ट २०२४ साठी अर्ज करा.
बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी ही एक नामी संधी असून, भारतीय विज्ञान शिक्षण आणि संशोधन संस्थेत (आयसर) पदवी आणि पदव्युत्तर शिक्षणाची दारे यामुळे खुली होणार आहेत. देशातील सर्वोत्तम विद्यार्थ्यांना विज्ञान शिक्षण देणाऱ्या ‘आयसर’ या जगप्रसिद्ध संस्था आहेत. प्रवेश परीक्षेच्या माध्यमातून पाच वर्षांच्या ड्यूअल डिग्रीसाठी विद्यार्थ्यांची निवड करण्यात येते. बारावी विज्ञान किंवा समकक्ष परीक्षा किमान ६० टक्के गुणांसह २०२२, २३ किंवा २४ मध्ये
उत्तीर्ण झालेले उमेदवार प्रवेश परीक्षेसाठी अर्ज करू शकृता
हे लक्षात ठेवा
■ अर्जाची मुदत : १३ मे
■ अर्जात सुधारणा : १६ ते १७ मे
प्रवेशपत्र उपलब्ध होणार : १ जून
■ प्रवेश परीक्षा : ९ जून
■ संकेतस्थळ : http:// www.iiseradmission.in/
देशातील आयसर
■ पुणे, बर्हमपूर, भोपाळ, कोलकता, मोहाली, तिरुपती, तिरुअनंतपुरम
जागांची संख्या
■ बीएस-एमएस प्रोग्रामसाठी एकूण जागा : एक हजार ९३३