माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (इ.१०वी) व उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (इ.१२वी) परीक्षेस प्रविष्ट होणा-या खेळाडू विद्यार्थ्यांना सवलतीचे वाढीव गुण देण्याबाबत sport extra Mark’s 

Join Now
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

 माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (इ.१०वी) व उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (इ.१२वी) परीक्षेस प्रविष्ट होणा-या खेळाडू विद्यार्थ्यांना सवलतीचे वाढीव गुण देण्याबाबत sport extra Mark’s 

संदर्भ: १. शासन निर्णय, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग क्र. उमाशि २०१५/प्र.क्र.२६२/ एस.डी.२, दि.२० डिसेंबर, २०१८.

२. शासन शुद्धीपत्रक, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग क्र. उमाशि-एस.डी.२, दि.२५ जानेवारी, २०१९.

संदर्भिय क्र. १ व २ अन्वये, माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (इ.१०वी) व उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (इ.१२वी) परीक्षेस प्रविष्ट होणा-या खेळाडू विद्यार्थ्यांना सवलतीचे वाढीव गुण देण्याबाबत शासनाने निर्णय घेतलेला आहे. संदर्भीय शासन निर्णय क्र.१ मधील परिशिष्ठ ५ अन्वये एकविध खेळांच्या राज्य संघटनेने क्रीडा व युवक सेवा संचालनालय व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयांना सादर करावयाच्या स्पर्धाविषयक कागदपत्रांची यादी नमुद केली आहे. त्यानुसार संबंधित खेळ संघटनांनी विविध स्तरावर पार पडलेल्या स्पर्धाचे रेकॉर्ड तथा अभिलेख क्रीडा व युवक सेवा संचालनालयाबरोबरच राज्यातील सर्व जिल्हा क्रीडा अधिकारी यांना सादर करणे आवश्यक आहे.

तथापी बऱ्याच एकविध खेळ राज्य संघटनाद्वारा संबंधित स्पर्धाचे रेकॉर्ड फक्त क्रीडा व युवक सेवा संचालनालय व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाकडे सादर केले जात नसल्याने संबंधित खेळातील खेळाडूंचे प्रस्ताव प्राप्त होऊनही त्यांना क्रीडागुणांची शिफारस करणे शक्य होत नाही. त्यामुळे अनेक खेळाडू क्रीडागुण सवलतीस पात्र असुनही त्यापासुन वंचित राहत असल्याचे निदर्शनास येत असून सदरची बाब ही क्रीडाविकासास मारक ठरणारी आहे.

संदर्भीय शासन निर्णयामधील यादीमधील नमुद ४७ खेळप्रकारांच्या एकविध खेळ राज्य संघटनांनी राज्य, राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावरील विविध स्पर्धाविषयक खालील नमुद अभिलेखे क्रीडा व युवक सेवा संचालनालय तसेच राज्यातील ३६ जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाकडे जमा करणे आवश्यक आहे.

१. ज्या स्तरावरील क्रीडा स्पर्धाचा क्रीडागुण सवलतीसाठी लाभ घ्यावयाचा आहे, त्या स्तरावरील क्रीडा स्पर्धांचे आयोजनाचे परिपत्रक.

२. ज्या स्तरावरील क्रीडा स्पर्धाचा क्रीडागुण सवलतीसाठी लाभ घ्यावयाचा आहे, त्या स्तरावरील क्रीडा स्पर्धाच्या भाग्यपत्रीका. (Copy Of Draw)

३. ज्या स्तरावरील क्रीडा स्पर्धांचा क्रीडागुण सवलतीसाठी लाभ घ्यावयाचा आहे, त्या स्तरावरील क्रीडा स्पर्धांचे अंतिम निकालपत्र.

४. ज्या स्तरावरील क्रीडा स्पर्धाचा क्रीडागुण सवलतीसाठी लाभ घ्यावयाचा आहे, त्या स्तरावरील क्रीडा स्पर्धात सहभागी झालेल्या खेळाडूंच्या नावाच्या प्राविण्यासहीत परिशिष्ठ-१० मधील नमुन्यातील याद्यांच्या २ प्रति. सदर कागदपत्रांवर राज्य संघटनेचे अध्यक्ष/सचिव यांच्या शाईची स्वाक्षरी व शिक्का आवश्यक. जिल्हा क्रीडा अधिकारी मुंबई शहर, मुंबई उपनगर व ठाणे यांना खेळाडूंच्या नावाच्या याद्या सादर करताना मुंबई शहर, मुंबई उपनगर व ठाणे या तीनही जिल्ह्याच्या एकत्रितपणे सादर करणे आवश्यक आहे.

५. एकविध खेळाच्या राज्य संघटनेचे अध्यक्ष व सचिव यांच्या शाईच्या नमुना स्वाक्षरीचे पत्र.

वरीलप्रमाणे नमुद स्पर्धाविषयक रेकॉर्ड तथा अभिलेखे क्रीड़ा व युवक सेवा संचालनालय तसेच सर्व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयांना दि.५ एप्रिल २०२४ पुर्वी उपलब्ध करुन द्यावेत. अभिलेखे उपलब्ध करुन न दिल्याने पात्र खेळाडू विद्यार्थी क्रीडागुणांपासून वंचित राहिल्यास त्याची जबाबदारी संबंधिताची राहील याची नोंद घ्यावी.

शासन निर्णय pdf येथे पहा

👉pdf download 

Leave a Comment