शालेय क्रीडा स्पर्धा आयोजनासाठी निधी वितरित करणेबाबत sport anudan

Join Now
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

शालेय क्रीडा स्पर्धा आयोजनासाठी निधी वितरित करणेबाबत sport anudan

शासन निर्णय

भारतीय खेळ महासंघा द्वारा पुरस्कृत शालेय स्तरावर विविध खेळांच्या स्पर्धाचे आयोजन तालुका ते राष्ट्रीय स्तरापर्यंत दरवर्षी करण्यात येते. विविध खेळांच्या राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत महाराष्ट्राचे प्रतिनिधी संघ / खेळाडू म्हणून सहभागी होतात. शालेय विद्यार्थ्यांमध्ये खेळाची गोडी निर्माण करून त्यांच्यातील क्रीडागुण हेरण्यासाठी या स्पर्धाचा चांगला उपयोग होतो आणि यातूनच उत्कृष्ट खेळाडू निर्माण होतात. विशेषतः ग्रामीण भागातील युवकांना विविध खेळांचे स्पर्धेमध्ये भाग घेण्याची संधी निर्माण व्हावी या दृष्टीने क्रीडा स्पर्धांना ही तितकेच महत्त्व आहे. विविध स्पर्धांमधून राज्यातील उत्कृष्ट खेळाडूंची निवड राष्ट्रीय स्पर्धे करता करण्यात येते. क्रीडा धोरण २०१२ मधील शिफारशी विचारात घेऊन शासन निर्णय दि. २४.१२.२०१४ अन्वये शालेय क्रीडा स्पर्धा आयोजित करण्याबाबतची कार्यपद्धती निश्चित करण्यात आलेली आहे. त्यानुसार तालुका, जिल्हा, विभाग, राज्य आणि महाराष्ट्र राज्यात आयोजित करावयाच्या राष्ट्रीय शालेय क्रीडा स्पर्धेच्या आयोजनासाठी व इतर बाबींसाठी निधी वितरीत करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

शासन निर्णय :-

मागणी क्र. ई-३२२०४- क्रीडा व युवक सेवा, १०४- क्रीडा व खेळ, (०५) राज्य संघाची प्रतिनियुक्ती (०५) (०८) शालेय क्रीडा स्पर्धा आयोजन (२२०४ ५६३५) (३५) वेतनेतर अनुदान या लेखाशिर्षाखाली सन २०२३-२४ या आर्थिक वर्षात उपलब्ध झालेल्या तरतुदीमधून रु.०७.२५.५६,९५०/- (अक्षरी रू. सात कोटी पंचवीस लक्ष छप्पन्न हजार नऊशे पन्नास फक्त) इतका निधी वितरीत करण्यास याद्वारे मान्यता देण्यात येत आहे.

२. सदरचे अनुदान ज्या प्रयोजनासाठी मंजूर करण्यात आले आहेत त्याच प्रयोजनासाठी खर्च करण्यात यावे.

1. उपरोक्त निधी आवश्यकतेनुसार मान्य निकषानुसार खर्च करण्यात यावा. ज्यावेळेस निधी प्रत्यक्ष खर्च करावयाचा त्याच वेळी आहरीत करावा. शासन लेख्याबाहेर बँक खात्यात हा निधी ठेऊ नये.

II. राज्य शासनामार्फत वेळोवेळी वित्त विषयक निर्गमित करण्यात आलेले विविध आदेश / नियम / शासन निर्णय वित्तीय नियमावली यांची अंमलबजावणी करुन वरील वितरीत तरतूदीचा विनियोग करण्याच्या अधीन राहून उपरोक्त तरतूद वितरीत करण्यास मान्यता देण्यात येत आहे.

३. शासनाच्या सूचनांनुसार उपरोक्त तरतुद खर्च करण्याबाबतची कार्यवाही करण्यात यावी. यासाठी संबंधीत उपसंचालक/जिल्हा क्रीडा अधिकारी/लेखाधिकारी, क्रीडा व युवक सेवा, पुणे यांना आंहरण व संवितरण अधिकारी व आयुक्त, क्रीडा व युवक सेवा यांना नियंत्रण अधिकारी म्हणून घोषित करण्यात येत आहे.

४. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेताक २०२३१२२६१५१३२३०४२१ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.

 

Sport anudan
Sport anudan

Leave a Comment