जालन्याच्या लेकीला साडेतीन कोटींचे पॅकेज शिक्षकाची मुलगी शीतल जुंबडचा थक्क करणारा प्रवास software engineer 

Join Now
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

जालन्याच्या लेकीला साडेतीन कोटींचे पॅकेज शिक्षकाची मुलगी शीतल जुंबडचा थक्क करणारा प्रवास software engineer 

मास्टर पदवी घेण्यासाठी गेलेल्या तरुणीने जीआरई तसेच टोफेल अशा दोन्ही परीक्षा पात्र करून अमेरीकेच्या स्टेट युनिव्हर्सिटी ऑफ युटाहमध्ये प्रवेश मिळवला. या उच्च पदवीच्या द्वितीय वर्षात असतानाच तिची इन्विडीया या कंपनीत सीनियर सिस्टिम सॉफ्टवेअर इंजिनिअर म्हणून निवड झाली. तिला यासाठी तब्बल ३ कोटी ६० लाखांचे पॅकेज मिळाले आहे. जालना ते थेट अमेरिका असा प्रवास करणारी शिक्षकाची मुलगी शीतल जुंबड मुलींसाठी रोल मॉडेल ठरली आहे.

जि. प. शाळेतील शिक्षक बाबासाहेब जुंबड यांची कन्या शीतल हिने कुटुंबीयच नव्हे तर जिल्ह्यात नोकरदारांच्या वेतनाचा रेकॉर्डच ब्रेक केला आहे. शीतलने इयत्ता पहिली ते चौथीपर्यंतचे शिक्षण बालविकास प्राथमिक शाळा जालना, पाचवी सरस्वती भुवन हायस्कूल, तर इयत्ता ६ वी ते १० वीचे शिक्षण जवाहर नवोदय विद्यालय परतूर, ११ वी १२ वी विश्वशांती ज्युनियर महाविद्यालय इंदेवाडी येथे पूर्ण केले. त्यानंतर बीटेक व्हीआयटी इंजिनिअरिंग कॉलेज पुणे येथून पूर्ण केले. त्यानंतर अमेरिकन विद्यापीठात मास्टर पदवीसाठी लागणाऱ्या जीआरई, टोफेल या दोन्ही परीक्षा पात्र केल्या. तिने असिस्टंट प्रोफेसर म्हणुन जॉब करत मास्टर्स अमेरिकेत केले. यादरम्यानच पीजी कॉम्प्युटर करत होती. कॅलिफोर्निया येथे सीनियर सिस्टिम सॉफ्टवेअर इंजिनिअर म्हणून ८ रोजी जॉइन झाली.

गुणी लेकीचा शिक्षक वडिलांना अभिमान..

वडील शिक्षक आणि आई गृहिणी अशा या जुंबड कुटुंबातील तिन्ही मुले सुशिक्षित आहेत. मुलगा व्हीआयटी पुणे येथे इंजिनिअरिंग करतो. बीटेक प्रथम वर्षात आहे. एक मुलगी एमबीबीएस द्वितीय वर्षात आहे. सर्वात मोठ्या शीतलने नुकतेच अमेरिकन विद्यापीठातील सर्वोच्च मल्टिनॅशनल कंपनीत स्थान मिळवले. मुलीचा अभिमान असल्याचे बाबासाहेब जुंबड यांनी सांगितले.

Leave a Comment