जि.प.प्राथ.शाळा कांबळेश्वर येथे राज्याला आदर्श दिशा दाखवणाऱ्या शाळापूर्व तयारी सोहळ्याचे दिमाखदार आयोजन shala purvtayari melava
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कांबळेश्वर ता बारामती जि पुणे येथे मंगळवार दि १६ एप्रिल २०२४ रोजी शाळेत शाळापूर्व तयारी मेळावा आयोजित केला होता .
सदर मेळाव्यात इ १ली व इतर वर्गात नव्याने शाळेत येणाऱ्या विद्यार्थां चे शारिरीक विकास , सामाजिक बौद्धिक विकास, भाषिक विकास, गणनपूर्व तयारीचे आकर्षक टेबल रचना . लेझिम नृत्य , सेल्फी पॉईट आदि नियोजन शाळेचे मुख्याध्यापक श्री . ज्ञानदेव सस्ते उपशिक्षक श्री रेवणनाथ सर्जे उपशिक्षिका सौ सुनिता शिंदे सौ मनिषा चव्हाण या सर्वांच्या कल्पक वृत्तीतून आदर्श नियोजनातून शाळेत दाखल विद्यार्थी स्वागत समारंभ पाहून आलेल्या पालकांनी कौतुक करून इ १ लीचे १६ व इतर वर्गांचे १४ असे ३० प्रवेश कन्फर्म केले . सदर मेळाव्यात शाळेत नव्याने येणारी १ ते ४ मधील सर्व मुलांच्या माता – पितानी मुलासमवेत दोघांनी हजर लावली . खाजगी / इंग्रजी माध्यमापेक्षा ही आकर्षक सजावट शाळेच्या उपशिक्षीका सौ सुनिता शिदे व मनिषा चव्हाण यांनी केली होती .
शाळेमध्ये शाळपूर्व तयारी मेळाव्याचे राज्याला आदर्श ठरतील अशी टेबलची रचना शाळेतील शिक्षकांनी केलेली होती शासन स्तरावरून जे आवश्यक टेबल होते त्यामध्ये शाळेच्या वतीने भर घालून स्पर्धा परीक्षा टेबल व अबॅकस शाळा उपक्रम टेबल असे दोन जास्तीचे टेबल ठेऊन त्या टेबलवर स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक सौ संध्या तावरे यांनी पालकांना शाळेच्या वतीने राबवण्यात येणाऱ्या मंथन स्पर्धा परीक्षा, Itse,, BTS, MTS, ऑलिम्पियाड या सर्व परीक्षा शाळेत १००% राबवण्यात येतात व सदर परिक्षेत शाळेतील विद्यार्थांनी राज्यात मिळवलेले यश यामध्ये शाळेचे मुख्याध्यापक श्री ज्ञानदेव सस्ते व सर्व शिक्षक स्टाफ वर्षभर स्पर्धा परीक्षे साठी वर्षभर राबत असून त्यांच्या बरोबर स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन तज्ञ नेमणूक करून नियोजन बाबत माहिती सांगितली .
अबॅकस टेबलवर संचालिका सौ शितल भगत यांनी अबॅकस उपक्रम फायदे त्याचबरोबर विद्यार्थी मेंदूची वाढ व विकास यासाठी शाळेचा पूरक उपक्रम शाळा राबवत असून अबॅकस ला शाळेतील ३२ विद्यार्थी गेले २ महीने तयारी करत असून १००% विद्यार्थी प्रतिसाद असून विद्यार्थी प्रात्यक्षिक करून दाखवले . अबॅकस शिवाय गणिती क्रीया करताना मुलंही छान प्रकारे प्रतिसाद देताना पाहून उपस्थित पालकांनी समाधान व्यक्त केले . शाळा उपक्रमांनी मुलांच्या बौद्धिक गुणवत्ता पूर्ण शिक्षणाला पूरक उपक्रमाची जोड मिळत असून या उपकमाळे शालेय स्पर्धा परीक्षा मध्ये फायदा होत असल्याचे मत श्री सर्जे सर सौ शिंदे मॅडम व चव्हाण मॅडम यांनी पालकांना पटवून दिले .
शाळा व्यवस्थापन समिती सदस्य सीमा खलाटे उपसरपंच गिरीष खलाटे शाळा व्यवस्थापन सर्व सदस्य खुंटेच्या माजी सरपंच माने ताई, संतोषरसाळ, धायगुडे, जगताप, पालक माता पालक या सर्वांनी प्रवेशपात्र विद्यार्थांना शुभेच्छा दिल्या .
१ ते ५ टेबल विविध क्षमता अजमावून घेणे . १ ली बरोबरच २ री ते ४थी मध्ये येणारी मुले यांची नेमकी सध्या ची तयारी किती आहे याची माहीती पालकांना दिली.
टेबल क – १ शारिरीक विकास
विद्यार्थी नोंदणीसह , वजन उंची, कार्ड भरणे साठी गायकवाड मॅडम खलाटे मॅडम श्री रेवणनाथ सर्जे सर यांनी सदर टेबलवर शाळेतील शिक्षक अंगणवाडी प्रमुख , नोंदणी केली .
टेबल क्र २ / ३
सामाजिक विकास बौद्धिक विकास भावनिक विकास
सदर टेबलवर सौ सुनिता शिंदे मॅडम , दिपाली लांडगे मॅडम , जगताप मॅडम वरील विकास बाबत पडताळणी केली .
टेबल ४ व ५ – भाषा विकास गणनपूर्व तयारी –
सदर टेबलवर सौ मनिषा चव्हाण मॅडम , खरात मॅडम, विद्यार्थी मूल्यमापन साहित्याचे सहाय्याने हसत खेळत मुलांना साहित्याच्या मार्फत प्रश्न विचारले मुलांनी छान प्रकारे प्रतिसाद दिला .
टेबल क्र ६- स्पर्धा परीक्षा/ इंग्रजी सुधार प्रकल्प माहितीचा टेबल –
सदर टेबलवर स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक सौ संध्या तावरे –
स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन करणारे तज्ञ शिक्षक विविध स्पर्धा परीक्षा माहिती दिली शाळेच्या वतीने वर्षभरात स्पर्धा परीक्षा उपक्रम माहिती जवाहर नवोदय सैनिक स्कूल प्रवेश परीक्षांसाठी ची बेसिक तयारी व पालकांना मार्गदर्शन केले .
टेबल क्र ७ –
अबॅकस व सहशालेय उपक्रम टेबल –
सदर टेबलवर अबॅकस मार्गदर्शक सौ शितल भगत या सर्व पालकांना अबॅकस माहिती व मार्गदर्शन केले . शाळेतील मुलांचे प्रात्यक्षिक पाहण्याची संधी पालकांना मिळाली
टेबल क्र ८ –
मातांना साहीत्य वाटप व पालकांना मार्गदर्शन टेबल –
सदर टेबलवर मुख्याध्यापक श्री ज्ञानदेव सस्ते यांनी पालकांना विद्यार्थी प्रगतीचा आढावा दिला . शाळेचे पहिले पाऊल पुस्तक वाटप, मातृभाषेतून शिक्षणाचे महत्व सेमी अध्यापन तयारी, विद्यार्थी नेमकी तयारी कशा पद्धतीने करून घेतली जाणार . वर्षभर चालणारे व्यक्तिमत्व विकासाचे उपक्रम पालकांच्या मनातील शंका निरसन, शाळेत शिक्षक पालक सहकार्यातून विद्यार्थी विकास करत असताना परस्पर संबंध, शालेय भौतिक सुविधा , गुणवत्ता वाढीसाठी पालक – शिक्षक माता पालक मेळावे आदि बाबत मार्गदर्शन आदी शाळेतील सर्व वर्षभर राबवणाऱ्या उपक्रमाची माहिती दिली .
सकाळी ८ ते ११ वेळात विद्यार्थांना मातांना पालकांना संपूर्ण वर्षभरात राबवायचे उपक्रम स्पर्धा परीक्षा, तज्ञ मार्गदर्शक , मुख्याध्यापक, शाळेतील सर्व ,, अंगणवाडी प्रमुख, मदतनीस, स्पर्धा परीक्षा इंग्रजी सुधार मार्गदर्शक, अबॅकस प्रमुख , पहिली जादा वर्गाचे मार्गदर्शक सरपंच, उपसरपंच, सर्व सदस्य शाळा व्यवस्थापन अध्यक्षा उपाध्यक्षा सर्व सदस्य आदी सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत कार्यक्रम संपन्न झाला .