शैक्षणिक वर्ष सन 2024-25 शाळा पूर्वतयारी व शाळा प्रवेशोत्सवाचे आयोजन करण्याबाबत shala praveshotsav ayojan
परिपत्रक
संदर्भ : शासन निर्णय क्र. उपक्रम २३१५/प्रक्र/१२२/एस.डी.४/ मुंबई ९ जून २०१५.
उपरोक्त शासन निर्णय व विषयान्वये आपणास कळविण्यात येते की, दि. १५ जून २०२४ रोजी सोलापूर जिल्हयातील सर्व शाळा सुरु होत आहेत. व सन २०२४-२५ या शैक्षणिक वर्षास सुरुवात होत आहे.
शाळेतील वातावरण उत्साहवर्धक व आनंददायी रहावे, मुलांना शाळेतील वातावरण सुखकारक वाटावे यासाठी शाळा स्तरावर शाळा पूर्व तयारी व शाळा प्रवेशोत्सव कार्यक्रमाचे आयोजन करण्यात यावे. यासाठी संदर्भीय शासन निर्णयाचे अवलोकन करुन तसेच परिपत्रकातील खालील सूचनांप्रमाणे योग्य ती कार्यवाही करावी.
अ) शाळा पूर्व तयारी :-शाळा स्वच्छता: शाळा सुरू करण्यापूर्वी दिनांक १२ जून २०२४ ते दिनांक १४ जून २०२४ पर्यंत शाळांचे मुख्याध्यापक व सर्व शिक्षक यांनी शाळेत उपस्थित राहून शाळा पूर्व तयारीच्या अनुषंगाने शालेय परिसर, वर्ग खोल्या, मैदान, किचन शेड, मुख्याध्यापक कक्ष, ग्रंथालय, प्रयोगशाळा, वाचनालय इत्यादी संपूर्ण शाळा इमारत व परिसर यांची स्वच्छता करून घ्यावी. यासाठी गावातील ग्रामपंचायत व शाळा व्यवस्थापन समिती
यांचे सहकार्य घेण्यात यावे. प्रसिध्दी: शाळा पूर्व तयारी व शाळा प्रवेशोत्सव बाबत आपल्या शाळेतील उल्लेखनीय बाबींचे गावस्तरावर विविध समाजमाध्यमाद्वारे टीझर व्हिडीओ, वॉलपेपर इत्यादी व्हॉट्सअॅप स्टेटसवर ठेवावे तसेच दवंडी देऊन शाळेचे पोस्टर / बॅनर, फलक लेखन करून जनजागृती करण्यात यावी.
गुणवत्तेचे वार्षिक नियोजन सर्व शिक्षकांना शैक्षणिक वर्ष २०२४ २५ या वर्षातील वार्षिक नियोजन, मासिक
नियोजन, घटक नियोजन, मूल्यमापन नियोजन तयार करून घ्यावे. तसेच अध्ययन स्तर निश्चिती साठी आवश्यक ती सर्व पूर्वतयारी करून घ्यावी. याशिवाय शालेय गुणवत्ता वाढीसाठी आवश्यक वार्षिक आराखडा तयार करून घ्यावा आणि सन २०२४ २५ या शैक्षणिक वर्षासाठी शिष्यवृत्ती, जवाहर नवोदय विद्यालय परीक्षा, प्रज्ञाशोध व तत्सम इतर सर्व स्पर्धा परीक्षांचे नियोजन करावे, विद्यार्थी व्यक्तिमत्त्व विकासाच्या दृष्टीने आवश्यक विद्यार्थी गुणवत्ता शोध टैलेंट हंट स्पर्धा, क्रीडा स्पर्धा, विज्ञान प्रदर्शन इत्यादी सर्व बाबींचे सुक्ष्म नियोजन करण्यात यावे.
शाळा व्यवस्थापन समिती सभा शाळेचे शैक्षणिक वर्ष सुरू होण्याआधी दिनांक १२ जून २०२४ रोजी शाळा व्यवस्थापन समित्ती बैठक आयोजित करण्यात यावी सदर बैठकीमध्ये शैक्षणिक वर्ष २०२४-२५ साठी संपूर्ण वर्षाचा शैक्षणिक आराखडा तयार करण्यात यावा.
माता पालक सभा दिनांक १३ जून रोजी माता पालक सभा आयोजित करण्यात यावी. या सभेमध्ये शैक्षणिक वर्षाच्या पहिल्या दिवशी आपल्या सर्व पाल्यांना शाळेत उपस्थित राहणे संदर्भात व संपूर्ण वर्षभर नियमितपणे उपस्थित ठेवणे बाबत पालकांना आवाहन करण्यात यावे.
विविध शालेय समित्यांची स्थापना सन २०२४-२५ या शैक्षणिक वर्षासाठी शाळा व्यवस्थापन समिती, शालेय पोषण आहार समिती, परिवहन समिती, शिक्षक पालक संघ, माता पालक संघ, सखी सावित्री समिती, विशाखा समिती, तक्रार निवारण समिती इत्यादी आवश्यक शालेय समित्या शासन निर्णय / परिपत्रकानुसार स्थापन करण्यात याव्यात, व त्यांचे इतिवृत्त व अहवाल वेळोवेळी अदययावत करण्यात यावेत.