स्वतःमध्ये चांगल्या अभिरुची निर्माण करणे काळाची गरज self interest creation in life 

Join Now
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

स्वतःमध्ये चांगल्या अभिरुची निर्माण करणे काळाची गरज self interest creation in life 

प्रत्येक व्यक्ती समाजात राहत असते. कारण माणूस समाजशील प्राणी असल्यामुळे त्याच्याकडे मन असते. मन म्हणजे त्याचे विचार, भावना, प्रेरणा व अभिरुची होय. चांगल्या विचारामुळे त्याला सामाजिक प्रतिष्ठा लाभते. स्वतःमध्ये चांगल्या अभिरूची निर्माण करणे हे प्रगती व विकासाचे महत्त्वाचे अंग आहे. विकास साधण्यासाठी अभिरूची निर्माण करणे व त्याचे सातत्य टिकवून ठेवणे नितांत आवश्यक आहे. चांगल्या व वाईट अशा दोन प्रकारच्या अभिरुची माणसांमध्ये असतात. चांगल्या अभिरूची जाणीवपूर्वक निर्माण कराव्या लागतात. तर वाईट अभिरूची सहज विकसित होतात. चांगल्या अभिरुची निर्माण करण्यासाठी विचार करावा लागतो मात्र वाईट अभिरूचीसाठी विचार करण्याची

गरज भासत नाही. वाईट अभिरूची परिसरातून सहज अंगिकारल्या नकळतपणे जातात, कुटुंबातून, समाजघटकातून स्विकारल्या जातात.

लेखन-वाचन करणे, नानाविध खेळ खेळणे, व्यायाम करणे, योगासने करणे, बागकाम करणे, गीतगायन करणे, वादन करणे इत्यादी चांगल्या सवयीविषयी जाणीवपूर्वक अभिरुची निर्माण करावी लागते. अशा चांगल्या सवयीसाठी अभिरूची निर्माण झाल्यास आपले मानसिक व शारीरिक आरोग्य चांगले व उत्तम राहण्यास मदत होते. याउलट वाईट अभिरुचीमुळे मनात, शरीरात वाईट विकृती अधिवास करतात. जसे मादक पदार्थांचे, उत्तेजक पदार्थांचे सेवन करणे, तंबाखू, गुटखा, खऱ्हा (मावा) खाणे, दारू पिणे, जुगार खेळणे, वेश्यागमन

करणे, धूम्रपान करणे इत्यादी वाईट सवयींची आवड निर्माण झाल्यास त्याचा आपल्या मानसिक व शारीरिक आरोग्यावर निश् चितपणे दुष्परिणाम होतो. तसेच आर्थिक व सामाजिक स्तर घसरतो. कालांतराने मानसिक विकार तयार होतात. शरिरात विकृती निर्माण होतात. म्हणजेच वाईट अभिरूचीने व्यक्तीची सर्व बाजूंनी हेळसांड होते. कुटुंबात, समाजात अशा वाईट सवयी असलेल्या व्यक्तींची किंमत शून्य ठरते. वाईट अभिरुचीमुळे संपूर्ण कुटुंबातून, समाजातून वेळप्रसंगी बहिष्कृत सुद्धा व्हावे लागते.

चांगल्या अभिरूचीमुळे आपल्यामध्ये चांगल्या दर्जाचे विचार विकसित होतात व त्या चांगल्या विचारातून उत्तम व परिणामकारक कृती, कार्ये घडून येतात. मग चांगल्या कृतीतून आदर्श जीवनशैली तयार होते परिणामी विकसित होते. चांगल्या

अभिरुचीतून कार्यक्षमता विकसित झाल्यामुळे समाजोपयोगी चांगली कार्ये घडून येतात. वाईट अभिरुचीमुळे वाईट सवयी जन्म घेतात. त्या वाईट सवईमुळे आपल्या मानसिक, शारीरिक आरोग्याला तडा जातो त्यामुळे माणूस आर्थिकदृष्ट्या हतबल होतो. वाईट सवयीमुळे माणसाचे जीवन एकांगी बनते. शेवटी वाट्याला नैराश्य येते व या नैराश्यातून माणूस आयुष्यातून कायमचाच बाद होतो, निघून जातो. असे वाईट घडू नये म्हणून प्रत्येक व्यक्ती, स्त्री-पुरुष, समाजाने स्वतःमध्ये बदल करून चांगल्या अभिरुची निर्माण कराव्यात. जाणीवपूर्वक अंगिकाराव्यात व विकसित कराव्यात.

अभिरुची व प्रेरणा यांचा परस्पर संबंध आहे. प्रेरणेतून अभिरुची निर्माण होते. पुस्तक वाचावेसे वाटल्यानंतर ते जर

वाचनीय व अभिप्रेरक असेल तर त्यातून आपल्यात पुस्तक वाचनाची आवड निर्माण होते. पुस्तके वाचण्यात आपल्याला अभिरुची असते म्हणून आपण पुस्तकांचे वाचन करतो. म्हणजेच चांगल्या अभिरूचीतून चांगल्या सवयी जन्म घेतात, विकसित होतात. हळूहळू त्या आपल्या व्यक्तिमत्त्वाची अविभाज्य अंग बनतात. चांगल्या अभिरुचीतून आपले उत्तम व्यक्तीमत्त्व आकार घेते, आकाराला येते. म्हणजेच उत्तम व्यक्तिमत्व निर्माण करण्यासाठी चांगल्या सवयी अंगी बानाव्याच लागतात.

अंगिकाराव्याच लागतात. एकंदरीत चांगल्या अभिरूची ह्या व्यक्तीच्या मानसिक, शारीरिक, सामाजिक व आर्थिक स्वास्थ्याकरिता फार महत्त्वाच्या व उपयोगी ठरतात