महाराष्ट्र राज्यातील सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गाकरिता आरक्षण अधिनियम, २०२४ च्या अंमलबजावणीच्या अनुषंगाने द्यावयाचे जात प्रमाणपत्र आणि नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्र प्रदान करण्याबाबत मार्गदर्शक सूचना …
संदर्भ:-सामान्य प्रशासन विभाग शासन परिपत्रक समक्रमांक दि. ११ मार्च, २०२४.
शासन शुध्दीपत्रकः –
संदर्भीय शासन परिपत्रकासोबत जोडलेले परिशिष्ट-अ रद्द करण्यात येत असून याद्वारे सुधारीत परिशिष्ट-अ विहित करण्यात येत आहे.
२. सदर शासन परिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आले असून त्याचा संगणक संकेतांक २०२४०३१५१६५०५९०९०७ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे. महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.
शासन निर्णय pdf download