दि.१८/११/२०२४ व दि.१९/११/२०२४ या दिवशी शाळा सुरु ठेवणेबाबत आजचे शासन परिपत्रक school time table
विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-२०२४
दिनांक : १८/११/२०२४ व दिनांक: १९/११/२०२४ या दिवशी शाळा सुरु ठेवणेबाबत.
संदर्भ: शिक्षण आयुक्तालयाचे पत्र क्रमांक आशिका/प्राथ/१०६/निवडणूक सुट्टी/०६८७६, दि. १५/११/२०२४
उपरोक्त संदर्भीय विषयान्वये शिक्षण आयुक्तालयाचे संदर्भीय पत्रानुसार ज्या शाळेतील सर्व शिक्षकांची नियुक्ती निवडणूक कामकाजासाठी झाली आहे त्या शाळा दिनांक १८ नोव्हेंबर २०२४ व दिनांक १९ नोव्हेंबर २०२४ रोजी बंद ठेवणे संदर्भात संबंधित मुख्याध्यापक यांनी त्यांचे स्तरावरून निर्णय घेण्यात यावा अशा सूचना देण्यात आल्या होत्या. त्यामध्ये अंशतः सुधारणा करण्यात येत असून ज्या शाळांमधील सर्व शिक्षकांची नियुक्ती निवडणूक कामकाजासाठी झाली आहे त्या शाळेच्या नजीकच्या शाळेतील ज्या शिक्षकांची नियुक्ती निवडणूक कामकाजासाठी झालेली नाही त्यांचे मदतीने दिनांक: १८ नोव्हेंबर २०२४ व दिनांक: १९ नोव्हेंबर २०२४ रोजी शाळा सुरू ठेवण्यात याव्यात अशा सुधारित सूचना देण्यात येत आहेत.
👉केंद्राधक्ष दैनंदिनी भरलेला नमुना अहवाल
२/- आपणांस सूचित करण्यात येते की, राज्यातील सर्व व्यवस्थापनाच्या व सर्व माध्यमाच्या शाळा या दिनांक: १८ नोव्हेंबर २०२४ व दिनांक १९ नोव्हेंबर २०२४ रोजी सुरू राहतील, याचे संपूर्ण नियोजन संबंधित गटशिक्षणाधिकारी यांनी संबंधित मुख्याध्यापकांच्या मदतीने करावे.
३/- दिनांक: १८ नोव्हेंबर २०२४ व दिनांक १९ नोव्हेंबर २०२४ रोजी आपल्या कार्यक्षेत्रातील सर्व शाळा सुरु राहतील याची संपूर्ण जबाबदारी संबंधित गटशिक्षणाधिकारी यांची राहील.