01 मार्च 2024 पासून शाळेची वेळ- सकाळी 07:30 ते 11:30 सोलापूर जिल्हा परिषद school time table 

Join Now
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

01 मार्च 2024 पासून शाळेची वेळ- सकाळी 07:30 ते 11:30 सोलापूर जिल्हा परिषद school time table 

प्राथमिक शिक्षण विभाग, जिल्हा परिषद सोलापूर

सन २०२३-२०२४ शैक्षणिक वर्षातील सुट्टयांबाबत.

जिल्हा परिषद अंतर्गत जिल्हा परिषद व खाजगी प्राथमिक शाळांना सुचना (मराठी/कन्नड माध्यम)

शाळेत कोणताही कार्यक्रम करीत असताना क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचे प्रतिमेचे पुजन करावे.

उन्हाळयाच्या निमित्ताने सर्व शाळा दिनांक ०१.०३.२०२४ पासून सकाळी ७.३० ते ११.३० या वेळेत भरवावेत.

वार्षिक परीक्षा ही माहे एप्रील च्या दुस-या सत्रात घेणेत यावी.

उन्हाळयाच्या सुटटी नंतर सर्व प्राथमिक शाळा दिनांक १५.६.२०२४ पासून नेहमीप्रमाणे भरविण्यात यावेत.

प्राथमिक शाळा सतत तीन दिवस बंद राहणार नाहीत यादी दक्षता घ्यावी. यास गावची यात्रा अपवादात्मक राहिल.

स्थानिक परस्थितीनुसार यादीतील तारखेस एखादा सण येत नसेल तर ती सुटटी सणादिवशी घ्यावी व सुटटी घेणेपुर्वी

शाळा व्यवस्थान समितीच्या मान्यतेने गटशिक्षणाधिकारी यांची पुर्व परवानगी घ्यावी.

School time table
School time table

अर्ध्या दिवसाची शाळेचे वेळ ही सकाळी ८.०० ते ११.३० ही राहिल (शिक्षण हक्क अधिनियम नुसार)

सुटटीच्या यादीतील सुटया सोडून इतर दिवशी थोर नेत्यांची जयंती / पुण्यतिथी निमित्त शाळेस सुटटी न घेता त्या दिवशी शाळा पुर्ण भरविण्यात यावी हा दिवस वक्तृत्व स्पर्धा /निबंधलेखन इत्यादी स्पर्धा घेऊन साजरा करावा व प्रत्येक शाळेत झालेल्या कार्यक्रमाचा एकत्रीत केंद्राचा अहवाल केंद्र प्रमुखामार्फत गटशिक्षणाधिकारी कार्यालयास फोटोसह सादर करावा. व त्यास प्रसिध्दी वृतपत्रामध्ये देण्यात यावी.

श्रावण सोमवार निमित्ताने सर्व शाळा (सर्व सोमवार) सकाळी ७.३० ते १२.०० पर्यत भरविण्यात यावेत.

(अ)जिल्हा परिषदेच्या क्षेत्रातील शाळांची वेळ ही सकाळी १०.३० ते ५.०० अशी राहील.

(व) शाळेच्या पहिल्या व दुसऱ्या सत्रात १० मिनिटाच्या दोन सुटटया व ६० मिनिटाची मोठी सुटटी राहिल. (क) दुबार पध्दतीने शाळा भरत असलेतर तेथे १० मिनिटाची एक लहान सुटटी व ३५ मिनिटाची एक मोठी सुटटी राहिल.

रमजान उपवासानिमित्त उर्दु माध्यमाच्या प्राथमिक शाळांची वेळ सकाळी ७.३० ते १२.३० अशी राहील.

दिनांक २६ नोव्हेंबर या दिवशी सर्व शाळेत संविधान दिन साजरा करण्यात यावा.

पोळा/कारहुणवीची सुटटी ज्या त्या तालुक्यातील स्थानिक परंपरेनुसार घ्याव्यात व यास शाळा व्यवस्थापन समितीची मंजुरी घेणेत येऊन गटशिक्षणाधिकारी यांची पुर्व परवानगी घेणेत यावी.

मुख्याध्यापक अधिकार सुट्टी घेण्यापुर्वी संबंधित मुख्याध्यापकांनी गटशिक्षणाधिकारी पं.स. यांचेकडे तीन दिवस अगोदर लेखी कळवावे.

Leave a Comment