पहिली ते बारावी संयुक्त शाळा राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीसाठी राज्य शासनाचा निर्णय sanyukt shala
पुणे : पुढारी वृत्तसेवा राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० नुसार शिक्षण क्षेत्रात नव्याने वेगवेगळे बदल करण्यात येत आहेत. त्यानुसार आता शालेय शिक्षण विभागाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्राथमिक शाळांचे सक्षमीकरण व दर्जावाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यात पहिली ते आठवी, पहिली ते दहावी, पहिली ते
बारावी अशा संयुक्त शाळांची निर्मिती करण्यात येणार आहे. त्यासाठी सर्व प्राथमिक शाळांना आठवीपर्यंतचे आणि माध्यमिक शाळांचे वर्ग जोडण्यात येणार आहेत.
बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार तरतुदींनुसार शाळांचे सक्षमीकरण व दर्जावाढ करण्याच्या उद्देशाने काही पावले उचलली
आहेत. त्यामध्ये बालकाच्या घरापासून १ किलोमीटर अंतराच्या आत प्राथमिक शाळा व ३ किलोमीटर अंतराच्या आत उच्च प्राथमिक शाळांसाठी वाहतुकीची सुविधा देण्यात येणार आहे. सुधारित संरचनेनुसार चौथीपर्यंतच्या शाळेस पाचवीचा वर्ग व सातवीपर्यंतच्या शाळेस आठवीचा वर्ग जोडण्याबाबत