वर्ग 3 री ते 8 वी साठी राज्य सरकारचा मोठा निर्णय STARS प्रकल्प अंतर्गत नियतकालिक मूल्यांकन चाचणी (PAT) आयोजनाबाबत

Join Now
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

 

 

संकलित परीक्षा 1 व 2 संदर्भात

STARS प्रकल्प अंतर्गत नियतकालिक मूल्यांकन चाचणी PAT आयोजनाबाबत

संकलित परीक्षा 1 व 2 संदर्भात महत्वाचे

सन 2023 व 24 या शैक्षणिक कालावधीत इयत्ता तिसरी ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी तीन चाचण्या घेण्यात येणार आहेत संकलित मूल्यमापन चाचणी सत्र -1 संकलित मूल्यमापन चाचणी सत्र -2 या संकलित मूल्यमापन चाचणीच्या अनुषंगाने आहेत यामुळे शाळांनी इयत्ता तिसरी ते आठवी प्रथम भाषा, गणित व इंग्रजी या विषयांच्या संकलित मूल्यमापन चाचणी -1 व संकलित मूल्यमापन चाचणी-2 या दोन्ही चाचण्या पुन्हा नव्याने घेऊ नयेत उपरोक्त चाचणीत मिळालेले गुण हे संकलित मूल्यमापन चाचणीचे गुण समजण्यात यावेत या चाचण्यांची गुणनोंद सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन नोंदवही मध्ये घेण्यात यावी तसेच इतर विषयांच्या चाचण्या शिक्षकांनी आपल्या स्तरावर राज्यस्तर चाचणीच्या धर्तीवर तयार करून संकलित एक व दोन चे मूल्यमापन करावे

राज्यातील स्टार्स प्रकल्प मधील एस आय जी टू नुसार सन 2023 24 या शैक्षणिक वर्षात इयत्ता तिसरी ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी नियतकालिक मूल्यांकन चाचणीचे आयोजन करण्यात मान्यता देण्यात आलेली आहे यास अनुसरून 2023 24 या शैक्षणिक वर्षात पायाभूत चाचणी संकलित मूल्यमापन चाचणी एक व संकलित मूल्यमापन चाचणी दोन अशा तीन नियतकालिक चाचण्या घेण्याचे नियोजन करण्यात आलेले आहे एकूण दहा माध्यमातून चाचणी होईल प्रथम भाषा गणित व तृतीय भाषा या तीन विषयांची इयत्ता तिसरी ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी चाचण्यांचे आयोजन करण्यात येणार आहे

यास अनुसरून राज्यातील इयत्ता तिसरी ते आठवीच्या शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या विद्यानिकेतन सराव पाठशाळा समाज कल्याण विभाग शासकीय आदिवासी विकास शासकीय जिल्हा परिषद मनपा नफा नफा शासकीय सैनिकी शाळा कटक मंडळ एकलव्य मॉडेल रेसिडेन्शिअल स्कूल या शाळांमधील विद्यार्थ्यांच्या चाचण्या घेण्यात येणार आहेत यासाठी आवश्यक चाचण्यांचा पुरवठा राज्य स्तरावरून करण्यात येणार आहे

तथापि सदर चाचण्या अंतर्गत पायाभूत चाचणी दिनांक 17 ऑगस्ट 2023 ते 19 ऑगस्ट 2023 या कालावधीत घेण्यात आलेली आहे तर संकलित मूल्यमापन चाचणी सत्र एक व संकलित मूल्यमापन चाचणी सत्र दोन यांचे खालील प्रमाणे आयोजन करण्यात येणार आहे

चाचणी कालावधी

1)संकलित मूल्यमापन चाचणी सत्र एक माहे ऑक्टोबर 2023 शेवटचा आठवडा किंवा नोव्हेंबर पहिला आठवडा 2023

2)संकलित मूल्यमापन चाचणी सत्र 2 एप्रिल 2024  आठवडा पहिला किंवा दुसरा आठवडा

संकलित मूल्यमापन चाचणीचा अभ्यासक्रम

1)संकलित मूल्यमापन सत्र एक- प्रथम सत्रातील अभ्यासक्रम अध्ययन निष्पत्ती मूलभूत क्षमता यावर आधारित राहील

2)संकलित मूल्यमापन सत्र दोन -द्वितीय सत्रातील अभ्यासक्रम अध्ययन निष्पत्ती मूलभूत क्षमता यावर आधारित राहील

तरी उपरोक्त प्रमाणे सन 2023 व 24 या शैक्षणिक कालावधीत इयत्ता तिसरी ते आठवीच्या इयत्ता साठी तीन चाचण्या घेण्यात येणार आहेत संकलित मूल्यमापन चाचणी सत्र एक व संकलित मूल्यमापन चाचणी सत्र दोन या संकलित मूल्यमापन चाचणीच्या अनुषंगाने आहेत यामुळे शाळांनी इयत्ता तिसरी ते आठवी प्रथम भाषा गणित व इंग्रजी या विषयाच्या संकलित मूल्यमापन चाचणी एक व दोन पुन्हा नव्याने घेऊ नयेत उपरोक्त चाचणीत मिळालेले गुण हे संकलित मूल्यमापन चाचणीचे गुण समजण्यात यावेत या चाचण्या चाचण्यांची गुणवंत सातत्यपूर्ण संकेत मूल्यमापन नोंदवही मध्ये घेण्यात यावी तसेच इतर विषयांच्या चाचण्या शिक्षकांनी आपल्या स्तरावर राज्यस्तर चाचणीच्या धर्तीवर तयार करून संकलित एक व दोन चे मूल्यमापन करावे

 

Leave a Comment