इयत्ता 5 वी व 8 वी साठी गुणपत्रक नमुना वार्षिक परीक्षा/पुनर्परीक्षा बाबत मार्गदर्शक सूचना sanklit board exam
गुणपत्रकाबाबत सूचनाः
१) शेरा या स्तंभामध्ये विषयनिहाय उत्तीर्ण/अनुत्तीर्ण याची स्पष्ट नोंद करण्यात यावी.
२) कला, कार्यानुभव, आरोग्य व शारीरिक शिक्षण या विषयांसाठी दोन्ही सत्रांचे मिळून आकारिक मूल्यमापन होणार आहे. त्यामुळे या विषयांच्या बाबतीत दिनांक २० ऑगस्ट २०१० च्या सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन कार्यपद्धतीच्या शासन निर्णयातील १०.२ मधील श्रेणी पध्द्तीनुसार श्रेणी देण्यात यावी. गुणपत्रकावर गुण देण्यात येऊ नयेत.
३) पुनर्परीक्षा गुणपत्रकामध्ये कला, कार्यानुभव, आरोग्य व शा. शिक्षण यांच्या श्रेणीची नोंद घेऊ नये.
४) वार्षिक परीक्षेमध्ये एखाद्या विषयामध्ये विद्यार्थी अनुत्तीर्ण झाला असेल तर त्या विषयासाठी पुनर्परीक्षा घेण्यात येईल, असा शेरा देण्यात यावा.
५) संबधित विद्यार्थ्यांना अथवा पालकांना परीक्षेच्या निकालादिवशीच गुणपत्रक उपलब्ध करून देण्यात यावे.