नवनियुक्त शिक्षकांचे प्रशासकिय कारणास्तव समुपदेशन प्रक्रियेस स्थगीती नागपूर जिल्हा परिषद samupdeshan

Join Now
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

नवनियुक्त शिक्षकांचे प्रशासकिय कारणास्तव समुपदेशन प्रक्रियेस स्थगीती नागपूर जिल्हा परिषद samupdeshan

शिक्षक अभियोग्यता व बुद्धीमत्ता चाचणी 2022 मुलाखतीशिवाय पदनिवडीचा विकल्प दिलेल्या संस्थामध्ये “पवित्र प्रणाली” अंतर्गत शिक्षक पदभरती निवड यादीतील उमेदवारांना समुपदेशन पद्धतीने पदस्थापना प्रक्रीयेस स्थगीती देण्याबाबत.

सुधारीत जाहीर सूचना

या कार्यालयाची जाहीर सुचना दिनांक 06.03.2024 अन्वये पवित्र पोर्टलवर प्रसिद्ध गुणवत्ता यादी नुसार जिल्हा परिषद, नागपूरला शिक्षक पदभरती करीता विकल्प दिलेल्या एकुण 345 उमेदवारांपैकी मुळ कागदपत्रे पडताळणी करीता उपस्थित झालेल्या उमेदवारांना शालेय शिक्षण व क्रिडा विभागाचे शासन निर्णय दिनांक 21 जून, 2023 मधील तरतुदीनुसार सोमवार दिनांक 12-03-2024 रोजी जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, सी.पी. अॅन्ड बेरार हायस्कुल जवळ, रवीनगर, नागपूर येथे समुपदेशन पद्धतीने पदस्थापना देण्यात येणार होती.

परंतू प्रशासकिय कारणास्तव सदर समुपदेशन प्रक्रियेस स्थगीती देण्यात येत असुन याबाबत पुढील सूचना देण्यात येतील, याची सर्व संबंधितांनी नोंद घ्यावी.

या कार्यालयाव्दारे प्रसिद्ध दिनांक 06.03.2024 रोजीचे जाहीर सूचनेतील इतर सुचना / निर्देश

कायम ठेवण्यात येत आहे.

samupdeshan
samupdeshan

1 thought on “नवनियुक्त शिक्षकांचे प्रशासकिय कारणास्तव समुपदेशन प्रक्रियेस स्थगीती नागपूर जिल्हा परिषद samupdeshan”

Leave a Comment