रजा नियम व रजेचे सर्व प्रकार “महाराष्ट्र नागरी सेवा (रजा) नियम १९८१” मधील महत्वाच्या तरतुदी rules of leave and types of leave 

Join Now
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

रजा नियम व रजेचे सर्व प्रकार “महाराष्ट्र नागरी सेवा (रजा) नियम १९८१” मधील महत्वाच्या तरतुदी rules of leave and types of leave 

रजेची सर्वसाधारण तत्वे

रजा हक्क म्हणून मागता येत नाही

• रजा मंजूर करणारा सक्षम प्राधिकारी लोकसेवेच्या निकडीमुळे रजा नाकारु शकतो किंवा रद्द करु शकतो.

• रजा मंजूर करणाऱ्या प्राधिकाऱ्यास कर्मचाऱ्याने मागितलेल्या रजेचा प्रकार बदलता येत नाही. त्यासाठी कर्मचाऱ्याची लेखी विनंती असली पाहिजे.

. कर्मचारी सेवेत असताना त्याच्य विनंतीवरुन भूतलक्षी प्रभावाने एका प्रकारच्या रजेचे दुसऱ्या प्रकारच्या रजेत परिवर्तन करता येते. मात्र त्यावेळी तशी रजा अनुज्ञेय असली पाहिजे. रजेच्या परिवर्तनामुळे जादा देण्यात आलेल्या रकमेची वसुली केली जाते किंवा थकबाकीची रक्कम दिली जाते.

रजेची सर्वसाधारण तत्वे

अनुपस्थितीचा कालावधी भूतलक्षी प्रभावाने असाधारण रजेत परिवर्तीत करता येतो. अशा प्रकारची रजा ही उपभागेण्यापुर्वी अर्ज करुन मंजूर करुन घेतली जात नाही तर अनुउपस्थिती नियमित करण्यासाठी ही रजा नंतर मंजूर केली जाते.

कोणत्याही प्रकारची रजा सतत ५ वर्षाहून अधिक

कालावधीकरीता मंजूर करता येत नाही. पुर्वी ५ वर्षे

अनुपस्थित राहिल्यास नोकरी गमवावी लागत होती

(BCSR) पण आता सलग रजा मंजुरीस प्रतिबंध

रजेच्या कालावधीत नोकरी किंवा व्यवसाय सक्षम

प्राधिकाऱ्याच्या पूर्व मंजुरीशिवाय स्वीकारता येत नाही. २४

तास सरकारी नोकर हे तत्व या मागे असल्याने अशी

परवानगी सहसा मिळत नाही.

राजपत्रित कर्मचाऱ्यास शासकीय वैद्यकीय अधिकाऱ्याच्या वैद्यकीय प्रमाणपत्राच्या आधारे वैद्यकीय कारणास्तव रजा मंजूर करता येते. अराजपत्रित कर्मचाऱ्यांना नोंदणीकृत बैद्यक व्यवसायीच्या वैद्यकीय प्रमाणपत्राच्या आधारे वैद्यकीय रजा मंजूर करता येते.

रजा मंजूर करणाऱ्या सक्षम प्राधिकाऱ्याला स्वेच्छा निर्णयानुसार दुसरे वैद्यकीय मत घेता येते. सामान्यतः रजेचा अर्ज आल्याबरोबर म्हणजे रजा चालू असताना ही कार्यवाही अपेक्षित. पण कर्मचारी परत हजर होताना ही कार्यवाही केली जाते व ती निरुपयोगी ठरते.

वैद्यकीय कारणास्तव रजेवर असलेल्या कर्मचाऱ्याने वैद्यकीय स्वास्थ्य प्रमाणपत्र सादर केल्याशिवाय त्याला कामावर घेता येत नाही.

रजेची सर्वसाधारण तत्वे

रजा संपल्यानंतर कामावर अनुपस्थित राहिल्यास शिस्तभंगाची कार्यवाही

रजा संपण्याचा दिवस ते कामावर रुजू होण्याचा दिवस या दरम्यानचा संपूर्ण कालावधी (रविवार व सुट्टया धरुन) अनुपस्थितीचा काळ म्हणून धरण्यात येतो.

रजेच्या मागे किंवा पुढे जर सार्वजनिक सुटया असतील तर त्या जोडून घेता येतील. कार्यालयीन कामकाज करणाऱ्यांना ही सवलत मिळते पण Field मध्ये जर पर्यायी कर्मचारी उपलब्ध असेल तरच हा लाभ मिळेल.

रजा नियम व रजेचे सर्व प्रकार pdf येथे पहा pdf download 

1 thought on “रजा नियम व रजेचे सर्व प्रकार “महाराष्ट्र नागरी सेवा (रजा) नियम १९८१” मधील महत्वाच्या तरतुदी rules of leave and types of leave ”

Leave a Comment