पोलीस विभागाच्या आर.एस.पी.अँड सी.डी. राज्यस्तरीय शिक्षक प्रशिक्षणास कार्यमुक्त करणेबाबत RSP and CD state level training for teacher 

Join Now
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

पोलीस विभागाच्या आर.एस.पी.अँड सी.डी. राज्यस्तरीय शिक्षक प्रशिक्षणास कार्यमुक्त करणेबाबत RSP and CD state level training for teacher 

संदर्भ:- 1) शिक्षण संचालनालय (माध्य. व उच्च माध्य.) महाराष्ट्र राज्य, पुणे-1/ जा. क्र. शिसं/मावउमा / संकिर्ण-2023/ए- 1/3696 दि.19/7/2023 चा आदेश..

2) क्र. विपोमनिकोप/वाचक / आरएसपी / वाहतूक प्रशिक्षण / 2024-ई-755356, कोल्हापूर दि. 23/02/2024चे विशेष पोलीस महानिरीक्षक कोल्हापूर परिक्षेत्र यांचे आदेश….

3) जायक क्र./आर.एस.पी. प्रशिक्षण /78/2024 दि. 16/04/2024 अनिल शेजाळे महासमादेशक आर.एस.पी.प्रमुख महाराष्ट्र राज्य, सांगली, यांचे पत्र..

महाराष्ट्र पोलीस विभागाने अधिकृत एकमेव, महाराष्ट्र राज्य वाहतूक सुरक्षा दल व नागरी संरक्षण संघटन, नागपूर, जि. सांगली. यांचे व्दारा राज्यातील शिक्षकांचे “राज्यस्तरीय शिक्षक अधिकारी प्रशिक्षण वर्ग” सांगली येथे दि. 10 में 2024 ते दि. 19 में 2024 या कालावधीमध्ये मा. पोलीस अधिक्षकसो यांच्या नियंत्रणाखाली सांगली पोलीस मुख्यालय, विश्रामबाग, सांगली. येथे आयोजित केला आहे महाराष्ट्र राज्य शे. सं.व.प्र.प., पुणे-30 दि.1/10/2015 चे परिपत्रक नुसार इ.5वी व इ. 8 वी तसेच इ.७वी ते इ.10 वी साठी वाहतूक सुरक्षा व नागरी संरक्षण (आर.एस.पी.) यासाठी वेळापत्रकात दोन तासिका नविन अभ्यासक्रमानुसार दिलेल्या आहेत तसे अभ्यासक्रमाचे नियोजन देखील सर्व शाळांना प्राप्त झाले आहे. तसेच 14 मार्च 2024 च्या शासन निर्णयानुसार आनंददायी शनिवार या उपक्रमात रस्ते सुरक्षा व आपत्ती व्यवस्थापन हा विषय सर्व शाळात अंमलबजावणी करणेचा आहे. त्यानुसार हा विषय राबवायचा आहे…

आरएसपी विषय राबविताना येणारा खर्च उदा. अधिकारी प्रशिक्षण, गणवेश व साहित्य, पुस्तके, प्रवास व निवास इ.महा.शा.जी.आर. /जी.ए.सी./1072/ई दि.10/02/1972 अन्वये अनुदानास पात्र आहे. या करीता प्रत्येक शाळेतून एक शिक्षक व एक शिक्षिका या विषयासाठी प्रशिक्षित करणेचे आहे. तरी सोबत दिलेल्या आवेदन पत्राच्या नमुन्यात प्रशिक्षण शुल्कासह एका शिक्षकाचा व एका शिक्षिकेचा अर्ज आपल्या शाळेतून पाठवावा व त्यांना प्रशिक्षणासाठी लागणारे सर्व साहित्य शाळेमार्फत देवून दि. 10 में 2024 रोजी शुक्रवारी सकाळी प्रशिक्षणासाठी पाठवावे. तत्पूर्वी खालीलप्रमाणे शुल्क व अर्ज निर्धारीत वेळेत सांगली येथे पाठवावेत.

१) प्रशिक्षण शुल्क रु. ५००,००/-, २) साहित्य (उच्च प्रतिचे कॅप, बँचेस, शोल्डर, टायटल्स, बेल्ट, व्हीसल, रिबन.इ.) रु. १०००,००/- ३). अल्पोपहार व जेवण- रु. २,३५०.००/- असे एकूण- रु. ३,८५०.००/-

प्रशिक्षण शुल्क डी डी ने अथवा रोखीने सोबतचे आवेदनपत्र / अर्ज खालील पत्यावर दि. ३० एप्रिल २०२४ पूर्वी पाठविणेचा आहे. बैंक कॅनरा बँक खाते क्र. ३७७७१०१००२२१८/IFSC Code- CNRB०००३७७७ अथवा, फोन पे / गुगल-पे ९८९०४९५६९५ नंबरवर पाठवावे. पत्ताः श्री. अनिल शेजाळे, महासमादेशक, आरएसपी. महा.राज्य. मु.पो. आष्टा ता. वाळया जि. सांगली. ९८९०४९५६९५

RSP and CD state level training for teacher 
RSP and CD state level training for teacher

प्रशिक्षण संदर्भातील पीडीएफ येथे पहा 👉👉👉pdf download

 

Leave a Comment