खाजगी शाळेत RTE अंतर्गत २५ टक्के मोफत प्रवेशाबाबत right to education
Right to education प्रति,:१) शिक्षणाधिकारी, बृहन्मुंबई, महानगरपालिका.
२) शिक्षण निरीक्षक मुंबई उत्तर/दक्षिण/पश्चिम.
३) शिक्षणाधिकारी (प्राथमिक), जिल्हा परिषद, सर्व.
विषय :- सन २०२४-२५ या शैक्षणिक वर्षाच्या आर.टी.ई. २५ टक्के प्रवेश
प्रक्रियेकरीता जिल्हयांतील आरटीई पात्र शाळांचे रजिस्ट्रेशन करणेबाबत.
संदर्भ- १. शासनाचे पत्र क्र. आरटीई-२०१९/प्र.क्र.२५/एसडी-१ दिनांक १३.०२.२०२४
२. शालेय शिक्षण व क्रीडा विभाग यांची अधिसूचना दिनांक ०९.०२.२०२४
उपरोक्त विषयावावत कळविण्यात येते की, child free education बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम, २००९ मधील कलम १२ (१) (सी) नुसार खालील व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये प्रवेश स्तरावर २५ टक्के जागा वंचित व दुर्बल घटकातील मुला/मुलींसाठी राखीव ठेवण्याची तरतूद आहे.
शासनाच्या संदर्भ क्र.१ च्या पत्रान्वये निर्देश दिलेले आहेत. तसेच त्यासंदर्भात शालेय शिक्षण व क्रीडा विभाग यांची अधिसूचना दिनांक ०९.०२.२०२४ अधिसूचना निर्गमित झालेली असून सदर अधिसूचनेमध्ये सुधारित नियम नमूद केलेले आहेत. त्यानुसार खालील नमूद व्यवस्थापनाच्या पात्र शाळांचे रजिस्ट्रेशन करण्यात यावे.
त्यानुसार right to education दरवर्षीप्रमाणे सन २०२४-२५ या वर्षांची आरटीई २५ टक्के प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन राबविण्यात येणार आहे. त्याकरीता आपल्या जिल्हयातील २५ टक्के प्रवेश प्रक्रिया लागू असलेल्या सर्व पात्र शाळांची नोंदणी दिनांक ६/०३/२०२४ ते दिनांक १८/०३/२०२४ या कालावधी मध्ये करण्यात यावी. २५ टक्के प्रवेश प्रक्रिया लागू असलेल्या सर्व पात्र शाळांनी नोंदणी करणे बंधनकारक आहे.
तरी आपल्या जिल्हयातील शाळांचे ऑनलाईन रजिस्ट्रेशन विहीत कालावधीत पूर्ण करण्यात यावे. ज्या जिल्हयांतील आरटीई अंतर्गत पात्र असलेल्या शाळांचे १०० टक्के resistration रजिस्ट्रेशन पूर्ण होणार नाही त्याची सर्वस्वी जबाबदारी संबंधित शिक्षणाधिकारी (प्राथमिक) व प्रशासन अधिकारी, यांची राहील याची नोंद घ्यावी.