81 सेवानिवृत्त शिक्षकांना 1 सप्टेंबर 2023 रोजी मिळणार नियुक्ती आदेश

Join Now
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

81 सेवानिवृत्त शिक्षकांना 1 सप्टेंबर 2023 ला मिळणार नियुक्ती आदेश समुपदेशनासाठी उपस्थित राहण्याचे आदेश

जालना जिल्हा परिषद मध्ये सेवानिवृत्त शिक्षकांना  मिळणार आदेश त्यासाठी जालना जिल्हा परिषद मध्ये शिक्षकांना हजर राहण्याची आदेश देण्यात आलेले आहेत त्यांचे ऑफलाइन पद्धतीने समुपदेशन होणार आहे आणि 01-09-2 023रोजी नियुक्ती आदेश मिळणार आहेत त्यासाठी संबंधित यादीतील 81 शिक्षकांना जिल्हा परिषद या ठिकाणी उपस्थित राहण्यासाठी सूचना देण्यात आलेले आहेत ही नियुक्ती तात्पुरत्या स्वरूपाची असणार आहे.

समुपदेशनासाठी एक सप्टेंबर 2023 रोजी उपस्थित

सदर शिक्षकांना समुपदेशनाकरिता 1सप्टेंबर 2023 रोजी दुपारी बारा वाजता ठिकाण कैलास वाशी यशवंतराव चव्हाण जिल्हा परिषद जालना या ठिकाणी या शिक्षकांना उपस्थित राहायचे आहे याच दिवशी नियुक्ती आदेश देखील मिळणार आहेत हे नियुक्ती आदेश तात्पुरत्या स्वरूपाचे असणार आहेत याची सर्व सेवानिवृत्त शिक्षकांनी दखल घ्यावी सेवानिवृत्त शिक्षकांची नियुक्ती होत असताना त्यांना नियुक्ती आदेश हे त्यांच्या संवर्गानुसार दिले जाणार आहेत सेवा जेष्ठतेचा निकष पण या ठिकाणी लावला जाणार आहे त्या संदर्भात सर्वांनी याची नोंद घ्यायची आहे व वेळेवर उपस्थित राहून आपले नियुक्त आदेश घ्यायचे आहेत आपण वेळेवर उपस्थित न राहिल्यास आपली ही जबाबदारी स्वतःची राहणार आहे त्यामुळे कोणत्याही परिस्थितीमध्ये आपणास जिल्हा परिषद जालना या ठिकाणी दुपारी बारा वाजता हजर राहणे गरजेचे आहे कारण सदर नियुक्ती आदेश हे माननीय मुख्य कार्यकारी जिल्हा परिषद जालना यांच्या अधिनस्त राहून आपल्याला नियुक्ती आदेश मिळणार आहेत त्यामुळे कोणीही गैरहजर राहू नये व आपले मूळ डॉक्युमेंट्स घेऊन त्या ठिकाणी उपस्थित राहावे अशा प्रकारच्या सूचना माननीय शिक्षणाधिकारी श्री कैलास दातखेळ साहेब यांनी पत्राद्वारे कळवलेले आहेत

कंत्राटी तत्त्वावर तात्पुरत्या स्वरूपाची नियुक्ती

जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये सेवानिवृत्त शिक्षकांना कंत्राटी तत्त्वावर तात्पुरत्या स्वरूपात नियुक्ती करणे बाबत चे पत्र आहे या संदर्भात जिल्हा परिषदेचे शाळांमध्ये सेवानिवृत्ती शिक्षकांचे कंत्राटी तत्त्वावर तात्पुरत्या स्वरूपात नियुक्ती करण्याबाबत सूचना निर्मित करण्यात आलेले आहेत अशा सर्व 81 शिक्षकांना कळविण्यात आलेले आहे त्यांना संबंधित समोर दिसण्यासाठी आज उपस्थित राहण्याबाबतचे हे पत्र माननीय कैलास दाटखेड साहेब शिक्षणाधिकारी प्राथमिक जिल्हा परिषद जालना यांनी निगमित केलेले आहे त्यांच्या आदेशानुसार या 81 शिक्षकांना आज उपस्थित राहण्यास संबंधित कळवण्यात आलेले आहे पत्रातील सूचनेनुसार विविध अटीच्या अधिक राहून या कार्यालयाचे संदर्भ क्रमांक दोन पात्र व इच्छुक शिक्षकांकडून आवेदन पत्र सादर करणेबाबत वर्तमानपत्रातून उपस्थित देण्यात आलेली होती यापूर्वीची जालना जिल्हा परिषद अंतर्गत येणाऱ्या सेवानिवृत्त शिक्षकांना वर्तमानपत्रातून कळवले गेलेले होते की ज्यांना इच्छा आहे ज्यांची यांना काम करण्याची इच्छा आहे अशा शिक्षकांना सेवेत तात्पुरत्या स्वरूपासाठी घेणार त्यासाठी जिल्ह्यातील वर्तमानपत्रातून देखील कळवण्यात आले होते याद्वारे शिक्षकांना निवेदन देण्यात आले होते की ज्यांना कोणाला इच्छा असेल काम करण्याची त्यांनी जिल्हा परिषद मध्ये आपले कागदपत्र घेऊन उपस्थित राहायचे आहे आणि त्यांच्या मुलाखती देखील घेतलेल्या होत्या आज त्यांना  समुपदेशनानुसार नियुक्ती आदेश देण्यात येणार आहेत त्यासाठी त्यांना उपस्थित राहण्याबाबत कळवले आहे

मुलाखतीसाठी ठिकाण आणि वेळ

तसेच संदर्भ क्रमांक चार नुसार कागदपत्र पडताळणीसाठी मुलाखतीसाठी या शिक्षकांना निमंत्रित केलेले आहे त्यांना मुलाखतीकरिता कैलासवासी यशवंतराव चव्हाण सभागृह जिल्हा परिषद जालना येथे दिनांक 14 /8 /2023 रोजी सकाळी दहा वाजता उपस्थित राहण्यासंदर्भात कळवलेले होतें त्यासाठी हे सदर पत्र निर्गमित करण्यात आलेले आहेत

सोबत आणायची कागदपत्रे

शिक्षकांना आपले मूळ कागदपत्रे घेऊन या ठिकाणी उपस्थित राहण्यासंदर्भात कळवले आहे कागदपत्रांमध्ये नियुक्तीचा मूळ आदेश महत्त्वाचा आहे तसेच जिल्हा परिषदेतील कायम झाल्याचा आदेश हे देखील महत्त्वाचे आहे आणि इतर कागदपत्रे म्हणजे एम एस सी आय टी असेल एस एस सी सर्टिफिकेट असेल एचएससी सर्टिफिकेट असेल अशा प्रकारचे सर्व सर्टिफिकेट्स घेऊन उपस्थित राहायचे आहे तसेच संवर्गानुसार यांना नियुक्ती देण्यात येणार आहेत सेवा जेष्ठता पण यामध्ये विचार केला जाऊ शकतो यासाठी दहा वाजता कैलासवासी यशवंतराव चव्हाण सभागृह जिल्हा परिषद जालना येथे उपस्थित राहण्याबाबत कळवण्यात आलेले आहे पात्र शिक्षकांची यादी प्रमाणे आपणास संदर्भ क्रमांक पाच अन्वये सूचित करण्यात येते की माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद जालना यांचे समर्थक आपणास कैलासवासी यशवंतराव चव्हाण सभागृह जिल्हा परिषद जालना येथे दिनांक 01- 09 -2023 रोजी दुपारी ठीक बारा वाजता जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये सेवानिवृत्त शिक्षकांना कंत्राटी जातावर तात्पुरत्या स्वरूपात नियुक्ती आदेश देण्याबाबत कार्यवाहीसाठी उपस्थित राहावे

शिक्षक भरतीसाठी होणार विलंब

नवीन शिक्षकांसाठी भरतीसाठी होणार विलंब यामध्ये अशा प्रकारचे शासन कंत्राटी पद्धतीने शिक्षकांची नियुक्ती करत आहे त्यामुळे नवीन भरतीसाठी नक्कीच वेळ लागणार आहे यासाठी ज्या विद्यार्थ्यांनी डेट परीक्षा उत्तीर्ण झाले आहेत सिटी परीक्षा उत्तीर्ण झाले आहेत अशा परीक्षा अशा विद्यार्थ्यांना आता भरतीसाठी आणखी वाट पाहावी लागणार आहे कारण शासकीय ठराव स्तरावरून अशा प्रकारच्या कंत्राटी शिक्षकांना नियुक्ती देण्यात आलेले आहेत यामध्ये सेवानिवृत्त शिक्षकांना संधी देण्यात आलेली आहे या सेवानिवृत्त शिक्षकांना वीस हजार रुपये मानधन देऊन त्यांच्याकडून काम करून घेतले जाणार आहे अशा प्रकारचे तुटून जे मानधन देऊन काम करून घेतले जाणार आहे यामुळे नवनियुक्त जे डीएड धारक विद्यार्थी आहेत जे की डेट परीक्षा उत्तीर्ण आहेत आणि गेली दहा ते पंधरा वर्षांपासून नोकरीसाठी वाट पाहत आहेत अशा शिक्षकांच्य प्रयत्नावर पाणी फिरणार आहे कारण राज्य शासन हे नवीन भरती करण्यासाठी उत्सुक नाही दिसत आहे त्यामुळे जे शिक्षक गेली दहा ते पंधरा वर्षांपासून सरकारी नोकरीची वाट बघत होते अशा शिक्षकांना याचा फटका बसणार आहे

सेवानिवृत्त शिक्षकांना पुन्हा सेवेमध्ये सामावून घेणे

सेवानिवृत्त शिक्षकांचा अनुभव यासाठी कामी येणार आहे आणि ज्या ज्या परिस्थितीमध्ये आहे त्या शिक्षकावर जो कामाचा बोजा होता तो भुजा कमी होणार आहे यांच्यामुळे शिक्षकावरील अतिरिक्त ताण कमी होण्यास मदत होणार आहे कारण अनेक शाळा वरती दोन शिक्षक आहेत पाच वर्ग आहेत दोन-तीन शिक्षक आहेत सातवीपर्यंत शाळा आहे अशा शाळेमध्ये या शिक्षकांची नियुक्ती केली जाणार आहे ज्या ठिकाणी शिक्षकांची कमतरता आहे त्या ठिकाणी अशा सेवानिवृत्त शिक्षकांची नियुक्ती केली जाणार आहे त्यामुळे त्या शाळेवरील अतिरिक्त ताण कमी होणार आहे आणि विद्यार्थ्यांना देखील अध्ययन अध्यापनामध्ये या शिक्षकांची मदत मिळणार आहे या शिक्षकांना कंत्राटी पद्धतीने तात्पुरत्या स्वरूपाची नियुक्ती देण्यात आलेली येणार आहे यांना कमी मानधनावर म्हणजे 20 हजार रुपये मानधनावर त्यांच्याकडून काम करून घेतले जाणार आह.

पवित्र पोर्टल कधी चालू होणार

शिक्षक भरतीसाठी राज्य शासनाने पवित्र पोर्टलचे पवित्र पोर्टल द्वारे शिक्षकांची भरती केली जाणार अशा प्रकारचे आदेश जारी केले होते परंतु अद्यापही या पवित्र पोर्टलला मुहूर्त मिळाला नसल्याने जे डी एड धारक आहेत ते नोकरीच्या प्रतीक्षेत आहेत अशा विद्यार्थ्यांवर एक प्रकारे अन्याय होत आहे कारण गेली 15 ते 20 वर्षापासून ते नोकरीसाठी वाट पाहत आहे काही शिक्षक काही विद्यार्थी तर दोन दोन तीन तीन वेळेस डेट परीक्षा पास झालेले आहेत तरीदेखील त्यांना अद्याप पर्यंत नोकरीमध्ये सामावून घेतले गेले नाही त्यामुळे त्या विद्यार्थ्यांमध्ये नाराजीचा सूर पाहिला मिळत आहे अशा असे विद्यार्थी आंदोलनाच्या पावित्र्यात आहेत शासन वेळोवेळी या विद्यार्थ्यांना आश्वासन देत आहे की लवकरच मोठी भरती होणार आहे परंतु कोणत्याही प्रकारची मोठी भरती अद्याप पर्यंत झालेली नाही 2010 नंतर कुठल्याही प्रकारची मोठी भरती शिक्षण क्षेत्रामध्ये केली गेलेली नाही त्यामुळे डीएड धारकांचा खूप मोठा जगता तयार झालेला आहे अशा विद्यार्थ्यांना खऱ्या अर्थाने न्याय मिळणे गरजेचे आहे परंतु शासन याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे व अशा विद्यार्थ्यांना कडून काम करून घेण्यापेक्षा सेवानिवृत्त शिक्षकांना पुन्हा संधी देऊन एक प्रकारे शैक्षणिक हानी तर होणार नाही ना हा प्रश्न देखील निर्माण होत आहे कारण नव्या उमेद नव्या उमेदीच्या या विद्यार्थ्यांना जर शिक्षण प्रवाहात मध्ये काम करण्याची संधी मिळाली तर हे विद्यार्थी खूप मोठ्या उत्साहाने काम करू शकतील व नवीन युगामध्ये या शिक्षकांची गरज भासणार आहे कारण डिजिटल युग आलेले आहे डिजिटल शाळेच्या माध्यमातून आपण शिकवत आहोत आणि नवीन नवीन प्रवाह यामध्ये शिक्षण क्षेत्रामध्ये येत आहेत यासाठी या विद्यार्थ्यांची शिक्षक म्हणून नियुक्ती होणे गरजेचे आहे परंतु अद्याप देखील त्यांच्या बाबतीत कोणत्याही प्रकारचा निर्णय झालेला नाही त्यामुळे सेवानिवृत्त शिक्षकांना तात्पुरत्या स्वरूपाची नियुक्ती येण्यासंदर्भात शासन विचार अधीन होते आणि त्या विचारामुळेच आज त्यांना नियुक्ती आदेश मिळणार आहेत

Leave a Comment