सर्वसाधारण बदल्या सन २०२४ साठी कर्मचाऱ्यांची माहिती तसेच बदलीतून सुट / प्राधान्य, विनंती बदली इ. अर्ज सादर करणे बाबत request transfer application
संदर्भ: १. ग्रामविकास विभाग, शासन निर्णय क्र. जिपब/प्र.क्र.-११२/आस्था-१४ दि. १५.०५.२०१४.
२. शासन शुध्दीप्रत्रक क्र. जिपब/४८१६/प्र.क्र.-१६/आस्था-१४ दि. ०२.०१.२०१७.
३. शासन पुरकपत्र क्र. जिपब/४८१७/प्र.क्र.-२२८/आस्था-१४ दि. ०४.०३.२०१९
उपरोक्त विषयान्वये ग्रामविकास विभागाकडील संदर्भाधीन शासन निर्णय, शुध्दीपत्रक व पुरकपत्रान्वये जिल्हा परिषदेच्या गट क (वर्ग-३) व गट-ड (वर्ग-४) कर्मचाऱ्यांच्या सर्वसाधारण बदल्यांबाबत सुधारित धोरणानुसार निश्चित करण्यात येवून बदल्यांची कार्यवाही पूर्ण करण्याबाबत निर्देश आहेत.
उपरोक्त संदर्भ क्र.०१ च्या शासन निर्णयान्वये जिल्हा परिषदेच्या अधिनिस्त कर्मचा-यांच्या सर्वसाधारण बदल्यांचे वेळापत्रक निश्चित करण्यात आलेले आहे. त्यानुसार खालीलप्रमाणे वेळापत्रक पुनःश्च अवगत करण्यात येत आहे.
उक्त प्रमाणे नमूद वेळापत्राकानुसार सर्वसाधारण बदल्या सन २०२४ साठी नांदेड जिल्हा परिषदेच्या सामान्य प्रशासन विभागाच्या अधिनस्त असलेल्या गट क (वर्ग-३) व गट-ड (वर्ग-४) अधिकारी / कर्मचाऱ्यांची गट विकास अधिकारी, पंचायत समिती यांनी तालुका मुख्यालयातील कार्यालय व तालुका अंतर्गत प्राथमिक
आरोग्य केंद्र, सर्व प्रशाला, प्राथमिक शाळा, पशुवैद्यकीय दवाखाने इत्यादी कार्यालयाची सोबतच्या विहीत प्रपत्रातील माहिती (DVOT-Surekh Font Size १२) Exel Sheet मध्ये संकलीत करुन संवर्गनिहाय स्वतंत्र विवरणपत्रात Hard व Soft Copy दिनांक १२/०४/२०२४ पूर्वी सादर करण्यात यावी. सर्वसाधारण बदल्यासाठी माहिती सादर करताना सेवार्थ प्रणालीतील पदसंख्या व कार्यरत पदानुसार मुळ सेवापुस्तीका तपासून माहिती सादर करण्याची दक्षता घ्यावी. सादर केलेल्या माहितीमध्ये तफावत आढळून आल्यास अथवा अपुर्ण माहिती सादर केल्यास संबधित आस्थापना लिपीक व कार्यालय प्रमुख यांना जबाबदार धरुन प्रशासकीय कार्यवाही प्रस्तावित करण्यात येईल याची गांर्भीयाने नोंद घ्यावी.
तसेच शासन निर्णयातील तरतुदीनुसार प्रशासकीय बदल्यामधुन सुट, प्राधान्य इत्यादी बाबतचे अर्ज तसेच विनंती बदली करीता शासन निर्णयासोबतच्या परिशिष्ट-१ मधील प्रपत्रात सादर करण्यातबाबत सर्व अधिकारी / कर्मचा-यांना आपल्या स्तरावरुन सुचना देण्यात याव्यात. विनंती बदली करीता अर्ज दिनांक २५/०४/२०२४, पुर्वी व प्रशासकीय बदलीमधून सुट, प्राधान्य इत्यादी बाबतचे अर्ज दिनांक ३०/०४/२०२४ पुर्वी स्विकारण्यात यावेत व आवश्यक शिफारशीसह दुस-या दिवशीच या कार्यालयास खास दुतामार्फत सादर करावेत. सदरील वेळाप्रत्रकाप्रमाणे विनंती बदली करीता अर्ज व प्रशासकीय बदलीमधून सुट, प्राधान्य इत्यादी बाबतचे अर्ज कार्यालयप्रमुखाचे शिफारशीने सादर करण्यात यावेत. विनंती बदलीचे अर्ज किंवा प्रशासकीय बदलीतुन सुट, प्राधान्य इ. बाबतचे अर्ज सामान्य प्रशासन विभागात परस्पर स्वीकारले जाणार नाहीत.
सदर वेळाप्रत्रकाप्रमाणेच पंचायत समितीस्तरावरील बदल्यांची पुर्वतयारी करणेची दक्षता घ्यावी. सोबत – विविरणपत्र-१ व बदली अर्ज.