यावर्षीपासून नापास झाल्यास वर्ग ५ वी व ८ वी साठी पुनर्परीक्षा होणार repeat board exam
यावर्षी शैक्षणिक सत्र २०२३-२४ पासून वर्ग पाचवी व वर्ग आठवी साठी वार्षिक परीक्षा घेण्यात येणार आहे यासाठी ची पूर्ण तयारी झालेली आहे यासाठी शाळेत स्तरावर प्रश्नपत्रिका तयार करून सदर परीक्षा घेण्याच्या सूचना राज्य शासन स्तरावरून देण्यात आलेले आहेत.
संकलित मूल्यमापन क्रमांक दोन चे आयोजन करत असताना शासन निर्णयानुसार सर्व कार्यवाही करण्याचे निर्देश राज्य शासन स्तरावरून देण्यात आलेले आहेत
यासाठी परीक्षेचे आयोजन शालेय स्तरावर करावयाचे आहे सदर प्रश्नपत्रिका तयार करताना राज्य शैक्षणिक संशोधन प्रशिक्षण परिषद पुणे यांच्या वेबसाईटवर जाऊन प्रश्नपत्रिका नमुना पहायचा आहे तसेच इतर नोंदी देखील पाहायचे आहेत व त्यानुसार शालेय स्तरावर प्रश्नपत्रिका तयार करावयाची आहे व परीक्षेचे आयोजन करावयाचे आहे.
सदर परीक्षा ही द्वितीय सत्राच्या अभ्यासक्रमावर आधारित असणार आहे वार्षिक परीक्षांसाठी पाचवीला प्रथम भाषा द्वितीय भाषा तृतीय भाषा गणित व परिसर अभ्यास हे विषय असतील तर इयत्ता आठवीसाठी प्रथम भाषा द्वितीय भाषा तृतीय भाषा गणित विज्ञान सामाजिक शास्त्र हे विषय असणार आहेत सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन योजनेतील संकलित मूल्यमापन क्रमांक दोन म्हणजेच वार्षिक परीक्षा असणार आहे परीक्षेसाठी प्रत्येक शाळेने शाळा स्तरावर प्रश्नपत्रिका तयार करून परीक्षा घ्यावयाची आहे यासाठी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे यांनी त्यांच्या वेबसाईटवर देखील प्रश्नपत्रिकांचा नमुना उपलब्ध करून दिलेला आहे.
वर्ग पाचवी व आठवी साठी परीक्षा देणे बंधनकारक आहे यामध्ये नापास होणाऱ्या विद्यार्थ्यांना पुनर्परीक्षा असणार आहे ही एक महत्त्वाची बाब आहे.
पाचवी आणि आठवीच्या वार्षिक परीक्षेत विद्यार्थी च विषयात उत्तीर्ण होऊ शकणार नाहीत शाळेमार्फत त्या विषयासाठी अतिरिक्त पूरक मार्गदर्शन प्रदान करून वार्षिक परीक्षेचा निकाल जाहीर झाल्यापासून दोन महिन्याच्या आत पुनर्परीक्षा देण्याची संधी देण्यात येणार आहे पुनर्परीक्षेचे आयोजन देखील शासन आदेशानुसारच संबंधित शाळांनी करावयाचे आहे.