क्यूआर कोडव्दारे हजेरी न देणाऱ्यांची व्हिडिओ कॉलव्दारे होणार पडताळणी मुख्य कार्यकारी अधिकारी करनवाल करणार कारवाई QR code presenty
नांदेड, पुढारी वृत्तसेवा : ग्रामीण भागातील कर्मचा-यांच्या उपस्थितीसाठी जिल्हा परिषदेने शाळा, प्राथमिक आरोग्य केंद्र, उप केंद्र, ग्राम पंचायत आदी ठिकाणी क्युआर कोड लावले न आहेत. परंतू काही कर्मचारी या • नवीन प्रणालीचा वापर करण्यास न नकार देत आहेत. या समस्येवर न उपाय म्हणून जिल्हा परिषदेच्या 1 प्रशासक तथा मुख्य कार्यकारी न अधिकारी मीनल करनवाल ह्या न शाळा, प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामपंचायत आदी कार्यालयातील – कर्मचाऱ्यांशी थेट व्हिडिओ र कॉलकरुन पडताळणी करणार न आहेत.दरम्यान कार्यालयाची वेळ व शिस्त न पाळणा-या व गैरहजर असणा-या कर्मचा-यांवर कारवाईचा बडगा उचलण्यात येणार आहे. ग्रामीण व दुर्गम भगात कर्मचारी गावात वेळेवर उपस्थित राहत नाहीत. काही वेळा अनुपस्थित राहतात अशा तक्रारी वारंवार जिल्हा परिषदेला येत होत्या. त्या अनुषंगाने ग्राम पातळीवरील कर्मचारी गावात वेळेत उपस्थित राहून आपले कर्तव्य बजवावे यासाठी गाव पातळीवर मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांच्या संकल्पनेतून कर्मचा-यांच्या उपस्थितीसाठी क्युआर कोड बसविण्यात आले. याव्दारे कर्मचा-यांची उपस्थिती थेट जिल्हा परिषदेत कळणार होती. बहुतांश शिक्षक, आरोग्य कर्मचारी, ग्रामसेवक आदी कर्मचारी या प्रणालीचा विरोध करत आहेत.
नंदगाव शाळेची केली पडताळणी क्युआर कोडव्दारे हजेरी न देणा-या कर्मचा-यांची व्हिडीओ कॉलव्दारे पडताळणी करण्याच्या मोहिमेला मंगळवारपासून (दि. २५) मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांनी सुरवात केली आहे. पहिल्याच दिवशी त्यांनी नंदगाव (ता. किनवट) येथील जिल्हा परिषद शाळेतील मुख्याद्यापकांना व्हिडीओ कॉल करुन शिक्षक उपस्थित आहेत का याची पडताळणी केली.
वेगवेळ्या ठिकाणच्या शाळा, ग्रामपंचायत, प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र, पशुवैद्यकीय दवाखाने, अंगणवाडी आदी कार्यालयात व्हिडीओ कॉल करुन कर्मचा- यांच्या उपस्थितीची पतडताळणी होणार आहे. दरम्यान कार्यालयात कर्मचारी हजर नसेल तर त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल.
मीनल करनवाल, मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नांदेड