सर्वेक्षण प्रगणक मानधन वाटप यादी खुला प्रवर्ग प्रति कुटुंब 100 रुपये व इतर प्रवर्ग कुटुंब 10 रुपये प्रमाणे यादी praganak mabdhan yadi
विषयः- प्रगणक यांचे मानधन अदा करणे बाबत.
संदर्भ:- १. सदस्य सचिव महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोग पुणे यांचे आदेश क्र.प्र.क्र.१०२/ पुणे :
/५१४ दि.१५.०३.२०२४
२. सदस्य सचिव महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोग, पुणे यांचे पत्र क्र./मरामाआ/ प्र.क्र. 348 / २०२३/प्रगणक/पुणे/६३७ दि.२८.०३.२०२४
उपरोक्त विषयी संदर्भ क्र. ०१ च्या आदेशान्वये प्रगणकास मागासवर्ग कुटुंबाच्या सर्वेक्षणासाठी प्रति कुटुंब रु.१० व मराठा/खुल्या कुटुंबाच्या सर्वेक्षणासाठी प्रति कुटुंब रु.१०० इतके मानधन निश्चीत करण्यात आले आहे असे नमूद करुन सोबतच्या तक्त्यामध्ये मराठा/खुल्या प्रवर्गाचे सर्वेक्षण केलेल्या प्रगणकांना अदा करावयाच्या मानधनाचा बीड जिल्हयाचा तपशील दिलेला आहे.
प्रगणक मानधन खुला प्रवर्ग प्रती कुटुंब 100 रुपये प्रमाणे व इतर कुटुंब 10 रुपये प्रमाणे यादी येथे पहा👉👉pdf download
तसेच संदर्भ क्र.०२ च्या पत्रान्वये प्रगणकांची संख्या व त्यांनी केलेले सर्वेक्षणाचे काम याची माहिती गोखले इन्स्टीटयुटकडून प्राप्त झाली असून त्यानुसार त्यांनी केलेल्या सर्वेक्षणाच्या कामाचे मानधन या कार्यालयाने मा. आयोगास सादर केलेल्या निवासी उपजिल्हाधिकारी, बीड यांच्या स्टेट बँक ऑफ इंडिया राजुरी वेस शाखा, बीड येथील खाते क्र. ६२००२५०८६५७ या बँक खात्यावर उपलब्ध करुन दिले आहे. गोखले इन्स्टिटयूटकडून प्राप्त जिल्हयाची प्रगणकांची तालुकानिहाय यादी सोबत देवून त्या यादीतील रक्कम रु.५०० प्रवास भत्ता प्रत्येक प्रगणकाच्या बँक खात्यावर जमा करणे बाबत तसेच सदर मानधन व खर्चाची रक्कम संबंधीतांना अदा करुन २ महिन्यांच्या आत उपयोगीता प्रमाणपत्र आयोगास सादर करणे बाबत व काही कारणास्तव काही रक्कम शिल्लक राहिल्यास ९० दिवसांच्या आत आयोगाच्या बँक खात्यावर परत करणे बाबत कळविले आहे.
त्याअनुषंगाने संदर्भ क्र.०१ व क्र.०२ ची प्रत व तहसीलदार यांना द्यावयाच्या निधीच्या तालुकानिहाय तक्त्याची प्रतं सोबत देण्यात येत असून सोबतच्या तक्त्यात नमूद प्रमाणे रक्कम संबंधीत तहसीलदार यांचे खात्यावर जमा करण्यात यावी.
सोबतः – वरीलप्रमाणे
Praganak