आम्ही जनतेचे मतदान घेतले, आमच्या मतदानाचे काय ? Postal ballot loksabha election
प्रतिनिधी / वृत्त केसरी अमरावती, २८ एप्रिल : अमरावती लोकसभा मतदार संघातील १८ लाख ३६ हजार ७८ मतदारांचे मतदान घेण्यासाठी ८९९२ कर्मचाऱ्यांचा फौजफाटा कामाला लागला. यामध्ये अनेक शिक्षक कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. त्यांनी मतदान केंद्राध्यक्ष, मतदान अधिकारी, बीएलओ आदी महत्वपूर्ण भूमिका पार पाळत लोकशाहीच्या उत्सवात सहभागी झालेल्या मतदारांचे मतदान झाले. मात्र यातील शेकडो शिक्षक कर्मचारी, जसे केंद्राध्यक्ष, मतदान अधिकारी, बीएलओ आदींपर्यंत बॅलेट पेपर न पोहोचल्याने जवळपास ७५ टक्के कर्मचारी मतदानापासून वंचित राहिले. आम्ही जनतेचे मतदान घेतले, आमच्या मतदानाचे काय ? लोकशाही बळकट करण्यासाठी मतदान हे सर्वात मोठे शस्त्र मानल्या जाते, असे असताना आम्हाला या पवित्र कामापासून वंचित का ठेवण्यात आले, असा संतप्त सवाल या शिक्षक कर्मचाऱ्यांनी केला असून लवकरच ते जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर क रणार असल्याची चर्चा सोशल मिडीयावरून सुरु आहे.
लोकसभा निवडणूक प्रक्रियेत जिल्ह्यातील शिक्षक, आरोग्य विभाग, मनपा, जिल्हा परीषद, महसूल, सार्वजनिक बांधकाम विभाग, पाटबंधारे विभाग आदीविभागातील कर्मचारी २६ एप्रिलरोजीच्या मतदानालाठी ४८ तासांपेक्षा अधिक काळसेवारतहोते.
२५
एप्रिल रोजी त्यांनी साहित्य घेतल्यानंतर आपापल्या मतदान केंद्रावर रवाना झाले. त्यानंतर २६ एप्रिलला मतदान झाल्यानंतर काहींना मध्यरात्रीपर्यंत तर काहींना शनिवारच्या पहाटेपर्यंत ईव्हीएम-व्हीव्हीपॅट जमा करण्यासाठी वेळ लागला. असे ४८ तास सेवात देत आपले कर्तव्य पार पाडणारे शकडो कर्मचारी मतदानापासून वंचित राहिल्याने त्यांच्यामध्ये संतापाची लाट पसरली आहे. मतदानापासून वंचित राहिलेल्या सर्व कर्मचाऱ्यांना मतदानाची संधी देण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
निवडणुकीदरम्यान, च्या काळात मतदान केंद्राध्यक्ष, मतदान अधिकारी, बी एल ओ आदींची
निवडणूक ड्युटी लावली होती. दरम्यान दोन निवडणूक प्रशिक्षणात त्यांनी 12 व 12 अफॉर्म भरून संबंधित ठिकाणी दिला. पण, 26 एप्रिलला हा फॉर्म निवडणूक मतदान संपेपर्यंत प्राप्त झाला नसल्याने जिल्ह्यातीलनिवडणूक ड्युटीवर असलेले ७५ टक्के कर्मचारी मतदानापासून वंचित राहिले असल्याची धक्कादायक माहिती आहे.
मतदानापासून वंचित ठेवण्याचा डाव तर नाही ?
विशेष म्हणजे निवडणूक आयोगाच्या आदेशाप्रमाणे मतदान टक्केवारी वाढावी म्हणून स्वीप कक्ष स्थापन करून व पिक फोर्स गावोगावी स्थापन करून शहरापासून ते गावोगावी वाड्या तांड्या पर्यंत मतदान जागृती अभियान राबविले त्याचा परिपाक आज अमरावती जिल्ह्यात गेल्या पंचवीस वर्षातील सर्वात जास्त मतदान टक्केवारी नोंदवल्या गेली, पण ज्यांनी लोकांचे मतदान घेतले, तेच मतदानाच्या हक्कापासून वंचित ठेवल्याने संबंधित कर्मचाऱ्यांमध्ये संतापाची लाट निर्माण झाली आहे. आधीच ईव्हीएम ऐवजी बॅलेट पेपरवर मतदान घेण्याचीएकीकडे मागणी सुरु असताना या सर्व कर्मचाऱ्यांपर्यंत पोस्टल बॅलेट पोहोचले नाही. आम्हा सर्व कर्मचाऱ्यांना मतदानापासून वंचितठेवण्याचाहाडावतर नाहीना…! अशीही चर्चा शासकीय कर्मचाऱ्यांच्या वर्तुळात सुरु आहे.