गटशिक्षणाधिकारी यांच्या परवानगीशिवाय शिक्षकांना या जिल्हा परिषदेत… नो एंट्री ! Permission for entry
गटशिक्षणाधिकारी यांची लेखी परवानगी शिवाय शिक्षण विभाग (प्राथ) जि.प. गोंदिया येथे न येण्याबाबत .
उपरोक्त विषयानुसार गटशिक्षणाधिकरी पंचायत समिती (सर्व) यांना या व्दारे कळविण्यांत येते की, पंचायत समिती अंतर्गत विस्तार अधिकारी (शिक्षण) केंद्रप्रमुख, मुख्याध्यापक, शिक्षक सहा. शिक्षक व इतर कर्मचारी शाळा सोडून तसेच कार्यालय सोडून बिना परवानगीने शिक्षण विभाग (प्राथ) जि.प. गोंदिया कार्यालयात येतात. त्यामुळे शाळेत शिक्षण घेत असलेल्या विदयार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेवर परिणाम होवून त्या विदयार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
करिता या व्दारे निर्देश देण्यांत येते की, गटशिक्षणाधिकरी पंचायत समिती (सर्व) यांची लिखीत स्वरुपाची पूर्व परवानगी घेतल्याशिवाय शिक्षण विभाग (प्राथ) जि.प. गोंदिया कार्यालयात येवू नये. या निर्देशाचे काटेकोर पणे अमलबजावणी करण्यांस्तव आपले पंचायत समितो कार्यालयाचे स्तरांवरुन सर्व जि.प. हायस्कूल. कनिष्ठ महाविद्यालय तसेच उच्च प्राथमिक, प्राथमिक तसेच इतर कर्मचारी यांना कळविण्यांत यावे,