शालेय पोषण आहार योजना स्वयंपाकी नेमणूक करारपत्र सन २०२१-२०२२ pdf mid day meal
शालेय पोषण आहार योजना स्वयंपाकी नेमणूक करारपत्र सन २०२१-२०२२
शासन निर्णय येथे पहा
👉👉pdf download
संदर्भ :-
१) केंद्रशासन मार्गदर्शक सूचना २००६
करारनामा पत्र येथे पहा
👉👉pdf download
२) केंद्रशासन आदेश क्र F.No.1-1/2009 – DESK (MDM) दि. २४/११/२०००९
३) केंद्रशासन आदेश क्र F.No.3-5/2010 – DESK (MDM) दि. २९/०४/२०१०
४) शिक्षण संचालक (प्राथ.) यांचे क्र.शा.पो.आ./सु.यो./२०१०-११/प्राशिस/३०३३४०९/ दि. १९/१०/२०१०
५) शासन निर्णय क्र. शापोआ २०१०/प्र.क्र१८/प्राशि/दि. ०२/०२/२०११
वरील संदर्भित आदेशान्वये आज दि. / /२०१९ रोजी शालेय व्यवस्थापन समिती
दिलेले काम समाधानकारकरित्या करत नसेल तर संबधितांची नेमणूक रद्द करण्याचा अधिकार शालेय व्यवस्थापन समितीस असणार आहे.
कामाचे नियोजन खालील प्रमाणे –
१) अन्न शिजवण्याचे काम करणे.
२) तांदूळ व धान्यादी मालाची साफसफाई करणे.
३) विद्यार्थ्यांना आहाराचे वाटप जेवणाच्या जागेवर करणे.
४) शाळेमध्ये विध्यार्थ्यानी आहाराचे सेवन केल्यानंतर स्वयंपाकगृहासह साफसफाई करणे. तसेच सांडलेल्या अन्नाची योग्य विल्हेवाट लावणे.
५) भांड्याची साफसफाई करणे व जेवल्यानंतर ताटांची स्वच्छता करणे.
६) पिण्याचे पाणी भरणेव जेवताना विद्यार्थ्यांना जेवणाच्या जागेवर पाणी पुरवणे.
७) शाळा व शाळेचा परिसर स्वच्छ ठेवणे.
८) अन्न शिजवणाऱ्यायंत्रणेच्या आहाराविषयक नोंदी ठेवणे. (बचत गट अथवा स्वयंसेवी संस्थेसाठी लागू)
९) अन्न शिजवून देताना स्वच्छता राखणे जेणेकरून कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही.
१०) स्वयंपाकगृह अथवा शालेय परिसर येथे कर्मचार्यास कोणत्याही प्रकारचा शारीरिक अथवा मानसिक इजा झाल्यास त्याची जबाबदारी शाळा व्यवस्थापन समिती अथवा शालेय व्यवस्थापन यांची राहणार नाही.
११) सदर करार हा १० महिन्यासाठी असल्याने नेमणूक झालेल्या कर्मचार्याचा कोणताही शासकीय सेवेच्या सलगतेसाठी हक्क राहणार नाही. आर्थिक वर्ष संपताच सदर करार अपोआप रद्द समजला जाईल.
करार करून देणारे