भावी गुरुजींना मोठा दिलासा; पसंतीक्रम देण्यास मुदतवाढ पवित्र पोर्टलवरील तांत्रिक अडचणीमुळे उमेदवार झाले होते हैराण pavitra portal teacher recruitment
पुणे : राज्यात पवित्र पोर्टलमार्फत लोकमत न्यूज नेटवर्क सुरू असलेल्या शिक्षक भरती प्रक्रियेत पसंतीक्रम देण्याची मुदत अखेर १२ फेब्रुवारीपर्यंत वाढवण्यात आली आहे. शिक्षण आयुक्त सूरज मांढरे यांनी गुरुवारी रात्री ही माहिती दिली.
वर्तमानपत्र pdf येथे पहा
👉pdf download
पवित्र पोर्टलवर माहिती भरताना मागील दोन दिवसांपासून उमेदवारांना तांत्रिक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. लॉगिन न होणे, प्रेफरन्स असाईन करीत असताना पोर्टलच बंद पडणे आदी कारणांमुळे उमेदवार हैराण झाले होते. पसंतीक्रम देण्यास मुदतवाढ देण्याची मागणी करणारे हजारो मेलदेखील शिक्षण आयुक्तालयाला मिळाले होते. पवित्र पोर्टलवर उमेदवारांना सोमवारपासून (दि. ५) प्राधान्यक्रम जनरेट करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यानुसार ६ आणि ७ फेब्रुवारी रोजी प्राधान्यक्रम जनरेट करणे आणि त्यानंतर ८ आणि ९ फेब्रुवारी रोजी प्राधान्यक्रम लॉक करावेत, असे सांगण्यात आले होते. आता ही मुदत १२ फेब्रुवारीपर्यंत असेल. लॉगिन न होणे, मध्येच पोर्टलच बंद पडणे आदी कारणांमुळे उमेदवार हैराण झाले आहेत.
प्राधान्यक्रम भरताना अनेक उमेदवार गोंधळून गेले आहेत आणि त्यात पोर्टल व्यवस्थित चालत नाही. नियम बदलाचा फटका अनेक उमेदवारांना बसल्यामुळे फॉर्म भरताना एरर येत आहे. प्रशासनाने शिक्षण आयुक्त कार्यालयात मदत केंद्र सुरू करावे – संतोष मगर, संस्थापक अध्यक्ष, डीटीएड्.. बी. एड़. स्टुडंट असोसिएशन
अर्ज भरण्याच्या मागणीस मुदतवाढ दिली आहे. याबाबत आलेल्या सूचनांची दखल घेऊन हा निर्णय घेतल्याचे शिक्षण आयुक्त सुरज मांढरे म्हणाले.
मंगळवारपर्यंत ५७००० उमेदवारांची नोंदणी
पवित्र पोर्टलवर गेल्या सोमवारी 3 रिक्त जागांची जाहिरात प्रसिद्ध झाली आणि भरती प्रक्रियेला सुरुवात झाली. पहिल्या दिवशी आठ हजार जणांनी प्राधान्यक्रम जनरेट केले होते.
त्यानंतर मंगळवारी रात्री ८:०० 3 पर्यंत ५७ हजार उमेदवारांनी प्राधान्यक्रम जनरेट केले होते. बुधवारपासून पोर्टलवर तांत्रिक अडचण येण्यास सुरुवात झाल्याचे निदर्शनास आले.
शिक्षण आयुक्त कार्यालयाकडून बुधवारी दुपारी अचानकपणे ४:०० ते ६:०० या कालावधीत देखभाल दुरुस्तीसाठी पवित्र पोर्टल बंद ठेवले होते.
मात्र, त्यानंतरही प्राधान्यक्रम भरण्यास अडचणी येतच आहेत. ८ फेब्रुवारीपासून प्राधान्यक्रम लॉक करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार होती. 8
मात्र, सायंकाळपर्यंत ही सुविधा सुरु झाली नाही. गुरुवारी सायंकाळी तर पोर्टल ठप्प पडल्याचेही अनेक उमेदवारांनी सांगितले.
ई-मेलवर – तक्रारींचा पाऊस
■ उमेदवारांकडून आवश्यक माहितीची अचूक नोंद स्व- प्रमाणपत्रामध्ये न केल्याने त्यांना योग्य ते प्राधान्यक्रम उपलब्ध होत नसल्याचे निदर्शनास येत आहे.
–
■ प्राप्त ई- मेलवरील संदेशांना योग्य उत्तरे दिली जात आहेत. ई- मेलची संख्या पाहता उत्तरे प्राप्त होण्यासाठी उमेदवारांनी प्रतीक्षा करावी, असे शिक्षण आयुक्त सुरज मांढरे यांनी परिपत्रकाद्वारे स्पष्ट केले आहे.