राज्यात 07 मे पासून धुवांधार गारपिटीसह पाऊस कोसळणार panjabrav dakh news
महाराष्ट्र राज्यात सध्या उन्हाची तीव्रता वाढत आहे.6
मेपर्यंत हवामान कोरडे राहणार आहे. त्यानंतर राज्यामध्ये 07
मेपासून 11 मेपर्यंत वादळी वाऱ्यासह विजेच्या
कडकडाटासह अनेक ठिकाणी गारपिटीसह पाऊस कोसळणार आहे. हा पाऊस सर्व दूर महाराष्ट्र राज्यामध्ये होणार
आहे. अचानक वातावरणात मोठा बदल होत आहे. यामुळे
कमी दाबाचा पट्टा निर्माण होणार आहे. हा पाऊस भाग
बदलत होणार आहे. यावर्षी वातावरण सतत बदलत
आहे. एप्रिल महिन्यात राज्यांतील विविध भागांमध्ये
विजेच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस झालेला
आहे. सध्या तापमान कमी जास्त होत आहे. सरासरी
तापमान 41 अंश सेल्सिअस ते 26 अंश सेल्सिअस सध्या
राहत आहे. 7 मेपासून धुवांधार पाऊस कोसळणार
आहे. हा पाऊस मान्सुनपुर्व पाऊस असणार आहे. सर्वत्र
पाणीच पाणी होणार आहे. राज्यात दिनांक 7,8,9,10,11 मे
दरम्यान मान्सनपर्व सरी कोसळणार आहेत.