शासकीय सुट्टीच्या दिवशी कार्यालये सुरु ठेवणेबाबत open office in holidays
ज्याअर्थी, दि. 23/03/2024 ते दि.25/03/2024 तसेच दि.29/03/2024 ते दि.31/03/2024 शासकीय सुट्टी आहे. तथापि वार्षिक बाजारमुल्य दर तक्ते 1 एप्रिल रोजी प्रसिद्ध होत असल्याने दुय्यम निबंधक कार्यालयात मार्च महिन्यात दस्त नोंदणीसाठी पक्षकारांची गर्दी होत असते. तसेच आर्थिक वर्ष 2023-2024 या वर्षाचा इष्टांक पूर्ण करण्याच्या दृष्टीने, महाराष्ट्र मुद्रांक शुल्क (अभय योजना) या संबंधीचे कामकाज करणेसाठी व दस्त नोंदणीसाठी दुय्यम निबंधक कार्यालयात पक्षकारांची गर्दी वाढत आहे.
त्याअर्थी, राज्यातील सर्व मुद्रांक जिल्हाधिकारी व सर्व दुय्यम निबंधक कार्यालये दि.23/03/2024 व दि.24/03/2024 तसेच दि.29/03/2024 ते दि.31/03/2024 या शासकीय सुट्ट्यांच्या दिवशी सुरु ठेवण्यात यावीत.
सर्व संबंधितांना योग्य ते निर्देश विनाविलंब देण्यात यावेत. तसेच याबाबत विस्तृत प्रसिद्धी देण्यात यावी.