‘टीईटी’ आता ऑनलाईनच! Online Tet exam
पुणे : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत ऑफलाईन घेण्यात येणारी शिक्षक पात्रता परीक्षा अर्थात टीईटी यापुढे ऑनलाईन घेण्यात येणार आहे. राज्यात नवीन वर्षात फेब्रुवारी महिन्यात संबंधित ऑनलाईन परीक्षेचे पहिल्यांदाच आयोजन करण्यात येणार आहे. आयबीपीएस या कंपनीमार्फत संबंधित परीक्षा घेण्याचे निर्देश राज्य सरकारकडून देण्यात आले असल्याची माहिती राज्य परीक्षा परिषदेतील अधिकाऱ्यांनी दिली.
राज्यातील प्राथमिक व माध्यमिक शाळांमध्ये इयत्ता पहिली ते पाचवी आणि सहावी ते आठवीसाठी सर्व व्यवस्थापन, सर्व परीक्षा मंडळे, सर्व माध्यम अनुदानित, विनाअनुदानित, कायम विनाअनुदानित इत्यादी शाळांमध्ये शिक्षण सेवक, शिक्षक पदावर नियुक्तीसाठी उमेदवारांना टीईटी उत्तीर्ण होणे अनिवार्य आहे. त्यासाठी परीक्षा परिषदेकडून दर वर्षी संबंधित परीक्षा ऑफलाईन घेण्यात येत होती. गेल्या दोन वर्षांत टीईटीमध्ये गैरप्रकार
● राज्यात फेब्रुवारीत परीक्षेचे आयोजन
● राज्य सरकारकडून राज्य परीक्षा परिषदेस निर्देश
बुद्धिमापन चाचणी, तसेच केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा अर्थात सिटीईटी या परीक्षा ऑनलाईन घेण्यात येत असल्यामुळे राज्याची टीईटी देखील ऑनलाईन घेण्यात यावी, अशी मागणी संबंधित परीक्षा देणारे उमेदवार करीत होते. त्यानुसार आता परीक्षा परिषदेने परीक्षा ऑनलाईन घेण्याचे निश्चित केले आहे.
अधिकाऱ्यांनी
राज्य परीक्षा परिषदेकडून सध्या परीक्षा ऑनलाईनच घेण्यावर भर आहे. तसेच राज्य सरकारकडून देखील टीईटी ऑनलाईन घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. त्यानुसार पुढील टीईटी ऑनलाईनच घेण्याचे नियोजन झाले आहे.
त्यासाठी बैठका, तसेच पत्रव्यवहार सुरू असून, आयबीपीएस या कंपनीमार्फत टीईटी फेब्रुवारी महिन्यात घेण्याचे प्रस्तावित आहे. परीक्षेचे वेळापत्रक, अभ्यासक्रम यांसह अन्य बाबी लवकरच जाहीर केल्या जातील.
– डॉ. नंदकुमार बेडसे, अध्यक्ष, राज्य परीक्षा परिषद
झाल्यानंतर संबंधित परीक्षेच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. तर, अभियोग्यता आणि
दिलेल्या माहितीनुसार, परीक्षा घेण्यासाठी किमान दोन महिने आधीपासूनच तयारी सुरू करावी लागते.
परीक्षेची रीतसर जाहिरात प्रसिद्ध करणे, उमेदवारी अर्ज मागविणे व अर्ज तपासणे, प्रश्नपत्रिका तयार करणे, प्रवेश पत्र वाटप करणे, बैठक व्यवस्था सज्ज ठेवणे या सर्व प्रक्रियेसाठी हा कालावधी देण्यात येत असतो.
जानेवारी महिन्यात सिटीईटी परीक्षा घेण्यात येणार आहे. तसेच केंद्रप्रमुख पदाची परीक्षादेखील घेण्यात येणार आहे. त्यामुळे आयबीपीएस या कंपनीला परीक्षेची तयारी करण्यासाठी लागणारा कालावधी लक्षात घेता टीईटी फेब्रुवारी महिन्यात घेण्याचे निश्चित करण्यात आले आहे.