Online Teachers Transfer : राज्यातील २३२९ प्राथमिक शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदल्या शिक्षकांमध्ये उत्साहाचे वातावरण 

Join Now
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Online Teachers Transfer : राज्यातील २३२९ प्राथमिक शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदल्या शिक्षकांमध्ये उत्साहाचे वातावरण 

Online Teachers Transferराज्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदलीचा सहावा टप्पा ऑनलाईन पद्धतीने राबविण्यात आला असून यामध्ये राज्यभरातील २३२९ शिक्षकांच्या बदल्या झाल्या आहेत.

यामुळे राज्यातील शिक्षकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. २०१७ पासून आंतरजिल्हा बदल्या ऑनलाईन पद्धतीने होत आहेत.

२१ जुन २०२३ च्या शिक्षण विभागाच्या निर्णयाने जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदल्या बंद होण्याचा धोका निर्माण झाला होता.

या निर्णयाविरोधात पावसाळी अधिवेशनात २४ जुलैला मुंबईतील आझाद मैदानावर शिक्षक सहकार संघटनेच्या वतीने आंदोलन सुरू करण्यात आले होते.

१० हजार शिक्षकांच्या स्वाक्षरी चे निवेदन यावेळी राज्य शासनाकडे सादर केले होते.

यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वतीने कॅबिनेट मंत्री डॉ.तानाजीराव सावंत यांनी राज्यातील प्राथमिक शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदल्या ऑनलाईन पद्धतीने सुरू करण्यात येतील असे आश्वासन शिक्षक सहकार संघटनेला दिले होते.

२८ ऑक्टोबरला मुंबई येथे राज्यातील प्राथमिक शिक्षकांच्या प्रश्नांबाबत शिक्षणमंत्री दिपक केसरकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या राज्यातील शिक्षक संघटनांच्या बैठकीत शिक्षक सहकार संघटनेचे राज्याध्यक्ष संतोष पिट्टलवाड व राज्य सरचिटणीस निलेश देशमुख यांनी राज्यातील बदलीपात्र झालेल्या सर्व शिक्षकांचा समावेश करून आंतरजिल्हा बदली प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने तात्काळ सुरू करावी अशी मागणी केली होती.

शिक्षण मंत्री दिपक केसरकर यांनी सर्वांचा समावेश करून तातडीने आंतरजिल्हा बदली प्रक्रिया सुरू करण्याचे आदेश शिक्षण व ग्रामविकास विभागाला दिले होते.

आंतरजिल्हा बदली प्रक्रियेचा सहावा टप्पा पूर्ण झाला असून यामध्ये राज्यातील २३२९ प्राथमिक शिक्षक बदलीने स्वजिल्ह्यात किंवा आवडीच्या जिल्ह्यात लवकरच हजर होणार आहेत.

यामुळे बदली झालेल्या शिक्षकांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे.

आंतरजिल्हा बदली प्रक्रिया पुर्ण झाल्याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, ग्रामविकास मंत्री गिरिशजी महाजन, आरोग्यमंत्री डॉ.तानाजीराव सावंत,उत्पादन शुल्क मंत्री शंभुराज देसाई,

शिक्षणमंत्री दिपक केसरकर, आ.प्रणिती शिंदे,आ. परिणय फुके,आ. संजयमामा शिंदे,आ.अभिमन्यू पवार,आ.अभिजित वंजारी, आ. किशोर दराडे यांचे राज्यातील शिक्षकांनी आभार मानले आहेत.

शिक्षण सहकार संघटनेचे राज्याध्यक्ष संतोष पिट्टलवाड यांच्या नेतृत्वाखाली आम्ही आतापर्यंत केलेल्या आंदोलन व पाठपुराव्याला आज २३२९ प्राथमिक शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदल्या झाल्याने यश आले.

राज्य शासनाचे विशेषतः शिक्षण व ग्रामविकास विभागाचे राज्यातील शिक्षकांकडून आभार. ग्रामविकास विभागाचे उपसचिव पोपट देशमुख यांच्यामुळे बदल्या नवीन भरती पूर्वी झाल्याने त्यांचे आभार.

– निलेश देशमुख, राज्य सरचिटणीस, शिक्षक सहकार संघटना महाराष्ट्र राज्य.

ग्रामविकास विभागाने बंद होत चाललेल्या आंतरजिल्हा बदल्या आँनलाईन केल्या,त्याच प्रमाणे जिल्हांतर्गत बदल्या देखील आँनलाईन पध्दतीनेच राबवुन बदल्यात होणारा भ्रष्टाचार थांबवावा ही विनंती.

आंतरजिल्हा बदली झालेल्या शिक्षकांना नविन भरती पुर्वी कार्यमुक्त करावे.

– संतोष पिट्टलवाड,राज्याध्यक्ष,शिक्षक सहकार संघटना महाराष्ट्र राज्य.

Leave a Comment