सन 2023 मधील आंतरजिल्हा बदली प्रक्रियेसाठी प्रोफाईल दुरुस्त/अपडेट करण्याची सुविधा मिळणेबाबत online teacher transfer

Join Now
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

सन 2023 मधील आंतरजिल्हा बदली प्रक्रियेसाठी प्रोफाईल दुरुस्त/अपडेट करण्याची सुविधा मिळणेबाबत online teacher transfer

 

शिक्षणाधिकारी अलिबाग यांचे ग्रामविकास विभागाला पत्र येथे पहा 👉PDF download 

 

संदर्भ- महाराष्ट्र शासन, ग्राम विकास विभाग, मुंबई यांच्या कडील पत्र क्र. आजिव २०२३/प्र.क.११७/आस्था-१४ दि.११/१२/२०२३.

उपरोक्त सदर्भिय विषयान्वये मा. उप सचिव, महाराष्ट्र शासन, ग्राम विकास विभाग, मुंबई यांच्याकडोल संदभीय पत्रात नमुद केल्यानुसार सन २०२३ मधील आंतरजिल्हा बदली प्रक्रिया अनुषंगाने सन २०२२ मध्ये अर्ज सादर केलेल्या मात्र बदली न झालेल्या शिक्षकांना तसेच सन २०१९ मध्ये सेवेत रुजू झालेल्या व नियमीत झालेल्या शिक्षकांना ऑनलाईन अर्ज सादर करण्यासाठी लॉगिन उपलब्ध करुन देण्यात आले आहे.

मात्र संबधित शिक्षकांनी लॉगिन केल्यानंतर त्यांच्या प्रोफाईल मध्ये जिल्हयात हजर दिनांक, सेवेत रुजू दिनांक, मूळ प्रवर्ग, नियुक्ती प्रवर्ग यामध्ये दुरुस्ती करणे आवश्यक असले बाबत विनंती सादर केली आहे. त्याचप्रमाणे EWS व SEBC या संवर्गातून निवड झालेल्या उमेदवारांना तसंच EWS व SEBC या प्रवर्गातील शिक्षकांना ऑनलाईन अर्ज सादर करताना खुला (General) हा पर्याय निवडण्यासाठी मार्गदर्शन उपलब्ध होणे आवश्यक आहे, सबब दि.१२/०१२/२०२३ ते दि.१५/१२/२०२३ या कालावधीत लॉगिन उपलब्ध करुन दिलेल्या शिक्षकांना त्यांचे प्रोफाईल

दुरुस्त करण्याबाबत त्यांचे वैयक्तिक लॉगिन मध्ये अथवा संबधित गटशिक्षणाधिकारी (BEO)/ संबधित शिक्षणाधिकारी (EO) यांचे लॉगिन मध्ये प्रोफाईल दुरुस्त/अपडेट करण्याची सुविधा मर्यादित कालावधी साठी उपलब्ध करुन दयावी ही नम्र विनंती.

जेणेकरुन पात्र शिक्षक बदली पासुन वंचित राहणार नाहीत तसेच अचूक प्रवर्गातुन पात्र शिक्षकांच्या बदलीची प्रक्रिया पूर्ण करण्याची कार्यवाही करता येईल, कृपया प्रोफाईल दुरुस्त अपडेट करण्याची सुविधा बाबत विनंती सविनय सादर करण्यात येत आहे मान्य व्हावी ही विनंती.

Leave a Comment