जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदली बाबत ग्रामविकास विभागाचे पत्र online teacher transfer
माननीय ग्रामविकास विभागाचे सर्व मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यांना पत्र
विषय जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांच्या आंतर जिल्हा बदली बाबत
जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांच्या आंतर जिल्हा बदली बाबत माननीय प्रधान सचिव ग्राम विकास यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक चार डिसेंबर २०२३ रोजी व्हिडिओ कॉन्फरन्स द्वारे बैठक आयोजित करण्यात आली होती सदर बैठकीमध्ये देण्यात आलेल्या निर्देशानुसार मुख्य कार्यकारी अधिकारी सर्व जिल्हा परिषद यांना पुढील प्रमाणे सूचना देण्यात येत आहेत
1. प्रत्येक जिल्ह्याला दोन फाइल्स अद्यावत करून पाठवायचे आहेत सदर फाइल्स विन्स इस कंपनीकडून आपणास ईमेलवर पाठवलेल्या असून त्या अद्यावत करून पाठवाव्यात.
2. पहिल्या फाईल मध्ये जे शिक्षक 2019 मध्ये रुजू झाले आहेत अशा शिक्षकांची माहिती अद्यावत करायची आहे.
3. दुसऱ्या फाईल मध्ये 2022 मध्ये भरले झालेल्या सर्व शिक्षकांची माहिती असेल त्या फाईल मध्ये दोन कॉलम अद्यावत करावयाचे आहेत
4. ई-मेल मध्ये एक टेबल दिली आहे त्यात प्रत्येक जिल्ह्याने बिंदू नामावली मध्ये खुल्या वर्गातील एकूण रिक्त पदांची जी संख्या भरली आहे ती टेबल मध्ये नमूद करावी त्यातील खुल्या वर्गातील संख्या व इ डब्ल्यू एस वर्गातील संख्या वेगवेगळ्या नमूद कराव्यात
वरील प्रमाणे माहिती विन्सेस कंपनीत तात्काळ उपलब्ध करून देण्यात देण्याबाबत सर्व संबंधितांना सूचना द्याव्यात.