विषय :- सन 2023 मध्ये T.T.M.S संगणकीकृत प्रणालीतुन ऑनलाईन आंतरजिल्हा बदलीने नाशिक जिल्हा परिषदेतुन इतर जिल्हा परिषदामध्ये विनंतीने बदली झालेल्या शिक्षकांना कार्यमुक्त करण्याबाबत…
संदर्भ :
-1. महाराष्ट्र शासन, ग्राम विकास विभाग, शासन निर्णय क्रमांक: आंजिब-2023 प्र.क्र.117/आस्था-14 दि.23 में, 2023.
2. महाराष्ट्र शासन, ग्राम विकास विभागाकडुन T.T.M.Sसंगणकीकृत प्रणालीद्वारे आंतरजिल्हा बदलीपात्र शिक्षकांची यादी व आदेश प्राप्त दि.30.12.2023
3. उप सचिव, महाराष्ट्र शासन, ग्रामविकास विभाग यांच्याकडील पत्र क्र.आंजिब-
2023/प्र.क्र.117/ आस्था-14 दि. 04 जानेवारी, 2024
4. या कार्यालयाचे पत्र क्र. जिपना/शिक्षण/प्राथ-04/44 ते 61/24 दि. 08.02.2024
शासन स्तरावरुन जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांच्या सन 2023 मधील आंतरजिल्हा बदली प्रक्रिया ऑनलाईन पध्दतीने राबविण्यात आलेली आहे. त्यानुसार शासन स्तरावरुन ऑनलाईन आंतरजिल्हा बदलीने नाशिक जिल्हयात इतर जिल्हयातुन येणारे 80 व नाशिक जिल्हयातुन इतर जिल्हयात जाणारे 122 बदलीपात्र प्राथमिक शिक्षकांची संगणीकृत यादी संदर्भीय क्र.02 नुसार या कार्यालयास प्राप्त झालेली आहे.
2. शासनाचे दि.04 जानेवारी, 2024 च्या पत्रात बदली प्रक्रीया राबविताना विद्यार्थ्यांचे शैक्षणिक हित महत्वाचे असुन त्यात खंड पडु नये यास्तव शालेय शिक्षण विभागाकडुन पवित्र पोर्टल मार्फत शिक्षक भरती प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर स्थानिक परिस्थिती लक्षात घेऊन आंतरजिल्हा बदली झालेल्या शिक्षकांना कार्यमुक्त करण्याबाबतचा निर्णय मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यांनी घ्यावा असे निर्देशित केलेले आहे.
3. गट शिक्षणाधिकारी यांनी सन 2023 मधील T.T.M.S प्रणालीतुन ऑनलाईन विनंतीने आंतरजिल्हा बदली झालेल्या शिक्षकांना कार्यमुक्त करण्यापुर्वी शासन निर्णय दि. 23.05.2023 नुसार संबंधिताच्या कागदपत्राची पडताळणी करावी. संबंधित शिक्षक पदवीधर असल्यास, त्यांना पदावनत करुनच कार्यमुक्तीची कार्यवाही करावी. तसेच त्यांच्या कडेस शासकीय येणे रक्कमा नाहीत, विभागीय खाते निहाय चौकशी सुरु नाही, न्यायालयीन प्रकरणात वादी/प्रतिवादी नाहीत. याबाबत खात्री करुनच तसेच शिक्षक पतसंस्थेकडील वसुली असल्यास अशी रक्कम वसुल करुनच त्यांना दिनांक 11 / 03/ 2022 पर्यत कार्यमुक्त करण्याबाबतची कार्यवाही आपले स्तरावरुन करण्यात यावी.
जिल्हा परिषद चे पत्र येथे पहा pdf download