आंतरजिल्हा बदली झालेल्या कर्मचा-यांच्या कार्यमुक्तीबाबत online teacher transfer
संदर्भ:-1. शासन निर्णय, ग्रामविकास विभाग क्र. 4820/प्र.क्र.291/आस्था-14 दिनांक 07.04.2021 2. शासन निर्णय, ग्रामविकास विभाग क्र. जिपब 2022/प्र.क्र.29/आस्था-14 दिनांक 23.03.2022.
3. ग्रामविकास विभाग, महाराष्ट्र शासन, मंत्रालय मुंबई-32 यांचेकडील संगणक प्रणालीद्वारे आंतरजिल्हा बदली झालेले शिक्षकांची यादी दिनांक 30.12.2023.
4. आपले पत्र क्र /अशिस/महाराष्ट्र राज्य/03/2024 दिनांक 04 जानेवारी 2024
उपरोक्त संदर्भीय पत्र क्रमांक 03 अन्वये, जिल्हा परिषद गडचिरोली अंतर्गत शिक्षकांच्या संगणकीय प्रणालीद्वारे ऑनलाईन पध्दतीने आंतरजिल्हा बदली झालेल्या एकुण 43 शिक्षकांची यादी प्राप्त झालेली आहे. तसेच गडचिरोली जिल्ह्यामध्ये आंतरजिल्हा बदलीने येणा-या शिक्षकांची संख्या 03 आहे.
गडचिरोली जिल्ह्याची रिक्त पदांची आजस्थितीतील परिस्थिती पाहता एकूण 889 प्राथमिक शिक्षक संवर्गातील पदे रिक्त आहे. सद्यस्थितीत रिक्त पदांची स्थिती 14% पेक्षा जास्त आहे. सदर परिस्थिती लक्षात घेता सध्यास्थितीत सदर शिक्षकांना भारमुक्त केल्यास पर्यायी व्यवस्था तसेच त्यांचेऐवजी नियुक्ती करण्यास शिक्षक उपलब्ध नसल्याने तसेच दरमहा मोठ्या संख्येने शिक्षक सेवानिवृत्त होत असल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यादृष्टीने सदर शिक्षकांना तुर्तास भारमुक्त करता येणार नाही. भविष्यात पदभरतीने अथवा इतर मार्गाने शिक्षक उपलब्ध झाल्यास सदर शिक्षकांना टप्या टप्याने भारमुक्त करण्यात येईल.
जिल्हा परिषद चे पत्र येथे पहा 👉pdf download